आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Party Will Create A Network Of Social Media Cell

राज्यात भाजप निर्माण करणार सोशल मीडिया सेलचे जाळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप प्रचारात सोशल मीडियाचा आधार घेणार असून, त्यासाठी या सेलच्या सदस्यांना कार्यशाळा घेऊन धडे देण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांव्यतिरिक्त सोशल मीडिया सदस्यांचे नवीन जाळे निर्माण करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे वारे आता जोरदार वाहत आहेत. भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजराचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार नरेंद्र मोदींनी हायटेक प्रचार मोहीम राबवण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाजपने पक्षांतर्गत सोशल मीडिया सेलची स्थापना केली आहे. मात्र, या सेलमध्ये पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांचा समावेश राहणार नाही. युवकांमधून या सेलच्या सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक बुथमध्ये 10 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. आपल्या बुथमधील प्रत्येक घरातील मतदारांची संपूर्ण माहिती सोशल मीडियाचे सदस्य गोळा करणार आहेत. या माहितीसोबतच कुटुंबप्रमुखांचा मोबाइल क्रमांकदेखील घेण्यात येणार आहे.
त्या माध्यमातून भाजप पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी मतदारांशी मेसेज किंवा कॉलच्या माध्यमातून संपर्कात राहणार आहेत. सोशल मीडिया सेलमधील सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विविध ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. विदर्भातील सेलमधील सदस्यांसाठी नागपूर येथे कार्यशाळा घेण्यात आली. यात विदर्भातून सुमारे सात हजार सदस्य सहभागी झाले होते. त्यांना सेलच्या कार्यपद्धतीबाबत विविध प्रकारची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेमध्ये अकोला शहरातून 20 कार्यकर्ते सहभागी झाले होते. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे एकू ण 172 बुथ आहेत. या प्रत्येक बुथमधून सोशल मीडिया सेलमध्ये 10 युवकांना घेण्यात येणार आहे. त्यामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात एक हजार 720 सोशल मीडिया सेलचे सदस्य राहणार आहेत.
तालुकानिहाय सेल सदस्य नोंदणी
भाजपच्या सोशल मीडिया सेलसाठी तालुकानिहाय सेल सदस्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी अकोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोट, मूर्तिजापूर आदी ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात सोशल मीडिया सेल स्थापन करण्याला वेग आला आहे.
महाविद्यालयीन युवकांचा राहणार समावेश भाजपच्या सोशल मीडिया सेलमध्ये महाविद्यालयातील युवकांचा समावेश राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये भाजपकडून सदस्य जोडण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. अधिकाधिक युवकांना पक्षासोबत जोडून घेण्याच्या दृष्टीनेही भाजपकडून प्रयत्न केले जात आहे.