आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरामध्ये रस्ते झाले; मात्र वाहतुकीची कोंडी कायमच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरातील काही भागांतील रस्ते तर झाले. मात्र, वाहतुकीची कोंडी अद्यापही कायम आहे. रस्त्यावरील उभ्या दुचाकींवर दंडात्मक कारवाईची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. मात्र, नवीन बनवण्यात आलेल्या डांबरी रस्त्यांवर चारचाकी गाड्या बिनदिक्कतपणे उभ्या केल्या जात असल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडली आहे.
अरुंद रस्ते आणि वाहनांची अधिक संख्या यामुळे वाहतुकीची कोंडी वाढल्यामुळे पोलिस प्रशासनाने टोइंग पथक कार्यान्वित केले. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात येते. रस्त्यावरील आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीच्या कारवाईमुळे टोइंग पथक वादात सापडले आहे. शहरातील काही मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे आता रस्ते रुंद झाले आहेत. मात्र, या रस्त्यावर दुकानचालकांनी, डॉक्टरांनी आणि पॅथॉलॉजीधारकांनी अतिक्रमण केले आहे. या रस्त्यावर चारचाकी वाहने उभ्या केल्या जात असल्याने या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होत आहे.
गांधीरोडवर वाहतुकीला अडथळा
गांधीरोडवर वन-वे दर्शवणारे फलक लावण्यात आला आहे. त्यासाठी सिटी कोतवालीकडे जाणाऱ्या दिशेने गांधी चौकात बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. मात्र, या बॅरिकेट्सचा कोणताही फायदा होत नाही. उलट या बॅरिकेट्समुळे वाहतुकीलाच अडथळा होत आहे.
कारवाईची गरज : नेकलेसरोडवर पॅथॉलॉजी, रुग्णालये आणि दुकाने आहेत. या दुकानदारांकडे चारचाकी वाहने आहेत. त्यांची सर्वांची वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.
पिवळे पट्टे मारावे : मनपाच्यानगरसेवकांनी पोलिसांच्या टोइंग कारवाईवर आक्षेप घेतले आहेत. रस्त्यावर पिवळे पट्टे मारल्याशिवाय उभे केलेले वाहने कोणते आणि कडेला उभी केलेली वाहने ओळखता येत नाहीत.
पार्किंग नाही : नेकलेस रोड ते सिव्हिल लाइन्स रोडवरील असलेल्या दुकानधारकांसाठी कार पार्किंगची कोणतीही सोय नाही. प्रतिष्ठानांसमोर जागा सोडली नसल्यामुळे त्यांना वाहने उभी करण्यासाठी जागाच नाही
वन-वे, पार्किंगच्या प्रायोगिक तत्त्वाचा फज्जा
शहरात गेल्या वर्षभरापासून प्रायोगिक तत्त्वावर वन-वे, दुचाकी आणि चारचाकी पार्किंगची स्थळे कार्यान्वित करण्यात आली आहेत. मे २०१४ पासून या नियमांची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, त्यावर पोलिसांकडून वाहनधारकांना मार्गदर्शन मिळाले नाही. तसेच दिशादर्शक फलकही उभारण्यात आले नाही. त्यामुळे कुठून कुठेही जा रस्ता तुमचाच, अशी परिस्थिती झाल्यामुळे वन-वे, पार्किंगच्या प्रायोगिक तत्त्वाचा फज्जा उडाला आहे.
वाहतूक पोलिसांकडून दुचाकींवर कारवाई, चारचाकी चालकांना मुभा
रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकी उचलून त्यांच्यावर कारवाई होते. मात्र, शेजारीच उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांवर कारवाई होत नाही. मग, दुचाकीवरच कारवाई का, असा प्रश्न उपस्थित होत असून, भेदभावपूर्व कारवाईमुळे नागरिकांमध्ये टोइंग पथकाच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केल्या जात आहे.
बातम्या आणखी आहेत...