आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकची दुचाकीला धडक, विद्यार्थी जागीच झाला ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळापूर- येथील सतरंजी व्यावसायिक अब्दुल रशीद यांचा नातू मानव इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या मो. अामेर अन्सारी खालीद अहमद अन्सारी वय १९ याचा शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना कान्हेरी गवळी फाट्याजवळ घडली. या अपघातामध्ये दुचाकीवरील मो. आमेरचा चुलतभाऊ मो. सैफ वकास अनिस अहमद अन्सारी हा गंभीर जखमी झाला.
प्राप्त माहितीनुसार, इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचा आज शेवटचा पेपर असल्याने हे दोघे जण बाभुळगाव अकोला येथील शिवाजी महाविद्यालयात येत होते. इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात असलेल्या मो. सैफ वकाससोबत क्रमांक एमएच ३० एपी ७७४५ या दुचाकीवरून ते येत होते. दरम्यान, कान्हेरी ते व्याळादरम्यान विरुद्ध दिशेने येत असलेल्या एका वाहनास ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक जीजे डब्ल्यू ८३१० ने दुचाकीच्या मागील बाजूस धडक दिली.
यामध्ये मो. आमेरच्या डोक्याला कानाजवळ जबर मार लागला दोघेही गाडीवरून खाली कोसळले. रक्तस्त्राव झाल्यामुळे अामेरचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सैफ वकास अनिस अहमद अन्सारी याचा पाय फ्रॅक्चर झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक मित्रमंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला होता.
बातम्या आणखी आहेत...