आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरा लुटारूंची टोळी केली जेरबंद, तिवसा येथील व्यापार्‍याला दोन लाखांनी गंडवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - रक्कम दुप्पट करून मिळेल, अशी बतावणी करून पुलगावच्या एका व्यापार्‍याचे दोन लाख रुपये सोमवारी तिवसा ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राजुरवाडी मार्गावरून लांबवण्यात आले होते. या प्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवत ग्रामीण पोलिसांनी 11 जणांच्या टोळीपैकी 10 जणांना ताब्यात घेतले असून, या टोळक्याने यापूर्वी अशाच प्रकारचे पाच गुन्हे केल्याचे तपासात पुढे आले आहे.
अशी केली ठगबाजी
पुलगाव येथील व्यावसायिक शे. रौफ यांची गावातील रघुनाथ इंगळेसोबत अनेक वर्षांपासून ओळख आहे. पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने रघुनाथने रौफ यांची किशोर शंभरकरसोबत ओळख करून दिली.
हे आहेत टोळीचे सदस्य
रघुनाथ आनंद इंगळे (55, रा. पुलगाव), किशोर हरिदास शंभरकर (32, रा. पुलगाव), नरेश हरिदास शंभरकर (55, रा. पुलगाव ह. मु. धामणगावरेल्वे), संजय सुरेश गावंडे (29, तळेगाव दशासर), मनोज महादेव वानखडे (25, रा. आजनगाव, धामणगावरेल्वे), अंशुल अशोक डोंगरे (22, रा. गणेशनगर, अमरावती), सुमित दत्ताेपंत आठवले (44, रा. संजय गांधीनगर, अमरावती), प्रदीप शंकर गायकवाड (33, रा. शिरजगाव कसबा), माणिक शंकर आठवले (50, रा. सावरखेड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर या टोळीचा म्होरक्या शिवराम सोनबावणे (रा. सोनेगाव खर्डा, ता. धामणगावरेल्वे) आणि वाहनचालक भूषण चंडकापूर (19, रा. यशोदानगर, अमरावती) यांचाही त्यात समावेश आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.