आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरीचे दोन लाखांचे सोने जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मागील महिन्यात खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीची घटना घडली होती. या चोरीचा छडा लावण्यासाठी खदान पोलिसांचे एक पथक सुरत येथे गत तीन दिवसांपूर्वी गेले होते. या चोरीतील 70 ग्रॅम सोने पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी एक आरोपी अटकेत आहे.

खदान पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या केशवनगर येथील रहिवासी उंबरकार यांच्या घरी चार लाखांची चोरी झाली होती. याप्रकरणी चोरीचा छडा लावण्यासाठी खदान पोलिसांनी दौलताबाद येथून शेख लियाकत शेख बाबू या आरोपीला अटक केली होती. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. शुक्रवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपणार आहे.

त्यानंतर खदान पोलिस या चोरट्याला न्यायालयात हजर करणार आहेत. खदान पोलिसांच्या पथकाने चोरीतील 70 गॅ्रम सोने हस्तगत केले आहे. त्याची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पंकज उदावंत, पोलिस कर्मचारी नरेंद्र पदमने, धनभर, राठोड व बोरकर यांनी केली.