आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिष्ठितांना फसवणाऱ्या 'मोहिनी'चा डाव उधळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- इज्जतीला घाबरणाऱ्यांना, प्रतिष्ठितांना, पैसेवाल्यांना आपल्या मोहपाशात अडकवायचे. त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायचे नंतर ब्लॅक मेलिंग करून पैसे उकळायचे, अशी टोळी शहरात सक्रिय आहे. त्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळला आहे. त्यामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.

पैसे, शौक पूर्ण करण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल, हे सांगता येत नाही. त्यासाठी आपल्या शरीराचा वापर होऊ देणे हे त्यांना काहीही गैर वाटत नाही. मात्र, अशा घटनांमुळे अनेकांचे आयुष्य मात्र उद्ध्वस्त होण्यावाचून राहत नाही. अशाच प्रकारचे एक रॅकेट जिल्ह्यात सक्रिय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या रॅकेटमध्ये अनेकांचा समावेश असून, ते प्रतिष्ठितांना आपले शिकार बनवतात. शिकारी जाळ्यात अडकला की, त्याला महिलेच्या बाहुपाशात ढकलतात. ही महिलाही सुरुवातीला प्रेमसंबंध असल्याचा बनाव करून त्याच्याशी रंगरलिया मनवते. मात्र, त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून मोठी रक्कम उकळते. जर पाहिजे तेवढी रक्कम दिली नाही, तर पोलिसात जाण्याची धमकी देते. त्या धमकीला घाबरून आपले कारनामे समोर येऊ नये, म्हणून बळी पळणारे, बदनामी नको म्हणून पाहिजे ते देण्यासाठी राजी होतात. जो देणार नाही त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार देऊन त्यास धमकावले जाते. अशीच घटना जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यामध्ये घडली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे सदर महिलेचा डाव पोलिसांनी उधळून लावला. उलट त्या महिलेची जन्मकुंडली पोलिसांनी तपासून पाहिली असता तिची उलट तपासणी सुरू केली. पोलिस तर आपलीच उलट तपासणी करताहेत हे बघून आता आपले बिंग फुटणार म्हणून, तिने काढता पाय घेतला, पोलिसात दिलेली तक्रार मागे घेऊन पोलिसांचा नाद सोडला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी जर घाईघाईत प्रकरण दाखल केले असते, तर पुन्हा एक जण या रॅकेटचा शिकार झाला नसता, हे कशावरून.

चौकशी करूनच दाखल व्हावा गुन्हा
महिलेची तक्रार आहे. म्हणून पोलिस ठाण्यांमध्ये अनेक वेळा चौकशी करता गुन्हे दाखल होतात. महिला अत्याचाराच्या अनेक गुन्ह्यांमध्ये निर्दोष असणारे गोवल्या जातात. त्यासाठी पोलिसांनी महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करता त्याची शहानिशा करून गुन्हे दाखल केले, तर अनेकांना त्याचा दिलासा मिळणार आहे.