आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thieves Loot Cash From A Trading Company Office In Appartment

चौकीदाराला कोंडून कार्यालयातील दीड लाख पळवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अपार्टमेंटच्या चौकीदाराला कोंडून चोरट्यांनी एका खासगी कंपनीच्या कार्यालयातील दीड लाख रुपयांवर हात साफ केल्याची घटना 6 नोव्हेंबरला बिर्ला गेट क्रमांक 2 च्या जवळ उजेडात आली.

दीपलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये बेरी ट्रेडिंग कंपनीचे कार्यालय आहे. अज्ञात चोरट्यांनी दाराचे कुलूप-कडी तोडून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील दीड लाख रुपये लंपास केले. 6 नोव्हेंबरला सकाळी चोरीची घटना उजेडात आली. चोरीची माहिती मिळताच रामदासपेठचे ठाणेदार विलास पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळावर धाव घेतली. या वेळी हस्ताक्षर तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी व्यवस्थापक र्शीनिवास पद्मनाभनराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

चौकीदाराला धमकावले

अपार्टमेंटमध्ये चौकीदार रामराव धांदे हे झोपले होते. चार जणांनी धांदे यांना एका खोलीत कोंडले. तसेच त्यांना धमकीही दिली. पोलिसांनी घडलेल्या घटनेबाबत माहिती घेतली.