आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास तीन वर्षांची शिक्षा;व्हॉट्सअप, फेसबुकवर माहिती शेअर करताना सावधान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - धार्मिक जातीय भावना दुखावतील असे फोटो, व्हिडिओ क्लिप, अश्लील फोटो, अश्लील आक्षेपार्ह मजकूर तयार करून पोस्ट करणे, लाइक करणे, शेअर करणे, कमेंट करणे, फॉरवर्ड करणे, प्रसारित करणे, अशी कृत्ये केल्यास संबंधित व्यक्तीला तीन वर्षे शिक्षा होऊ शकते. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार असे करणे गुन्हा आहे. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याचे आदेश विभागीय पोलिस कार्यालयाकडून आले आहेत.
सोशल मीडिया आणि मोबाइल अॅप्स खूप लोकप्रिय आहेत. या माध्यमातून गुन्हे घडत आहेत. आता या व्हॉट्सअप या मोबाइल अॅप्लिकेशनवर, फेसबुकवर संवेदनशील माहिती टाकल्यास अथवा ती शेअर केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार आहे. त्यासाठी कमीतकमी तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली आहे. तंत्रज्ञानात वाढ होत असताना त्याचे जसे फायदे आहे. तसेच सायबर गुन्ह्याचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुकवरून संवेदनशील आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणारी माहिती अपलोड करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल होणार आहे.

गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षा
^ सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुराविषयी तक्रार आल्यास कारवाई केल्या जाते.व्हॉटस्अॅप आणि फेसबुकसंदर्भात अमरावती ग्रामीण पोलिसांकडून तसे आदेश आले आहेत. अशा प्रकरणात कारवाई होते. गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांची शिक्षा होते.'' सी.टी. इंगळे, पोलिसनिरीक्षक, खदान ठाणे

सायबर क्राइम
अनेक तरुण आपल्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मजकूर साठवून ठेवतात आणि त्याचा प्रचार प्रसार करतात हा कायद्याने गुन्हा ठरतो.
पालकांनी द्यावे मुलांच्या मोबाइल वापराकडे लक्ष : व्हाॅट्सअॅप,फेसबुक गुपमध्ये कोण आहे, दररोज कशाची देवाणघेवाण होते याची माहिती ठेवणे गरजेचे झाले आहे. मुले काय करतो, हे पालक कधी तपासत नाहीत. पालकांनी मुलांच्या मोबाइल वापराकडे लक्ष देत विकृत मनोवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे.
माहिती फॉरवर्ड करताना घ्या काळजी
एखाद्या कुणाची बदनामी कारक, धार्मिक भावना दुखावणारा, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणारा मेसेज जर तुम्हाला आला असेल आणि तोच मेसेच तुम्ही इतरांना पाठवल्यास तो सायबर क्राइमनुसार गुन्हा आहे. त्यामुळे पाठवणारा आणि तो मेसेज आणखी इतरांना पाठवणारासुद्धा दोषी असल्यामुळे त्याच्याविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो.