आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘थर्टी फस्ट’साठी सगळ्यांची लगबग; अकोल्यात सजले हॉटेल्स्, ढाबे, बार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ‘थर्टी फस्ट’साठी जिल्ह्यातील हॉटेल्स् व्यावसायिक, ढाबे, बार सज्ज झाले आहेत. मद्य विक्रेत्यांनी आगाऊ बुकिंग सुरू केले आह़े मद्य विक्रीतून एका कोटी रुपयांची आगाऊ उलाढाल होणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आह़े मित्रांचे गट ‘थर्टी फस्ट’साठी सज्ज झाले आहेत. कोणत्या हॉटेल्स्मध्ये पार्टी करायची, याबाबतच्या चर्चा ठिकठिकाणी सुरू आहेत़
‘थर्टी फस्ट’पूर्वी शहरातच साजरा केला जात होता़ मात्र, आता याचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. ग्रामीण भागातील जनतेचा हॉटेल्स् व ढाब्यांकडे ओघ वाढला आहे. ग्राहकांना व मुलांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स् व्यावसायिकांनी खेळण्याचे साहित्य, धबधबे, पाण्याचे कारंजे, प्रशस्त वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़ इमारतींवर आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात येत आह़े विविध कंपन्यांच्या मद्याचे साठे करून ठेवण्यात येत आहेत़
खवय्यांसाठी मांसाहारी, शाकाहारी जेवणासाठी विविध मेन्यु उपलब्ध करून ठेवण्यात येत आहेत. हॉटेल्स् सजावटीसाठी रनिंग लाइट व मंडप बुकिंगसाठी हॉटेल्स् व्यावसायिकांची लगबग सुरू आह़े सध्या मटणाचा भाव 240 रुपये किलो, चिकन 120 रुपये किलो दराने विक्री होत आहे. हॉटेल्स्मध्ये मटणाची 440 रुपये किलो हंडी, तर चिकनची हंडी 400 रुपये दराने विक्री होत आहे. मनोरंजनासाठी हॉटेल्स् व्यावसायिकांनी डिजिटल साउंड सिस्टिम, आर्केस्ट्रा आदी कार्यक्रम निश्चित केले आहेत़ गावरान चिकन हंडी, लॉलिपाप, चिकन टिक्का, चिकन तंदुरी, दम बिर्याणी, पापलेट, सुरमई, कोळंबी, ओले बोंबील, गोड्या पाण्यातील मासळी, चायनीज आदी चटकदार व मसालेदार पदार्थांची मागणी वाढणार आहे. हे पदार्थ तयार करण्यासाठी आचारी व ग्राहकांना तत्परतेने सेवा मिळावी म्हणून वेटर व अन्य कर्मचार्‍यांची संख्या वाढवली आहे. अकोल्यात 120 वाइन बार, बिअर बार, 22 वाइन शॉप, 80 देशी दारूचे दुकाने आहेत. या दुकानांमधून 31 डिसेंबरला एक कोटीची उलाढाल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हॉटेल्स्मध्ये खाद्यपदार्थांच्या विक्रीतूनही सुमारे 30 लाखांची उलाढाल होण्याचा अंदाज हॉटेल्स् व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
नववर्ष स्वागतातील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिस सज्ज
काय असते ‘ब्रिथ अँनालायझर’ : ‘ब्रिथ अँनालायझर’ हे संबंधित चालकाच्या मुखाजवळ नेण्यात येते. चालकाला फुंकण्यास सांगण्यात येते. शरीरामध्ये पाच मिलिग्रॅमपेक्षा जास्त अल्कोहोलचे प्रमाण आढळल्यास कारवाई करण्यात येते.
मद्यपान करून चालवू नये वाहन
वाहनचालकांनी मद्य प्राशन करून वाहन चालवू नये. 60 टक्के अपघात हे मद्य प्राशन केल्याने घडतात. वाहतूक नियमांचे पालन केल्यास पोलिसांना कारवाई करण्याची गरज भासणार नाही.
-शिवशंकरसिंग ठाकूर, वाहतूक निरीक्षक.
मद्यपी वाहनचालक सावधान! ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीम
वेगळे पदार्थ ठेवणार
‘थर्टी फस्ट’ला हॉटेल्स्मध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे पदार्थ ठेवणार आहे. ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन नियोजन केले. ग्राहकांसाठी विविध खाद्यपदार्थ उपलब्ध करणार आहे. सतीश खत्री, हॉटेल व्यावसायिक, अकोला.
31 डिसेंबरसाठी जय्यत तयारी
31 डिसेंबरला ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन तयारी केली. ‘थर्टी फस्ट’ला मांसाहारी पदार्थांची मागणी असते. त्यामुळे पदार्थ तयार करणार आहे.
- अतुल पवनीकर, हॉटेल व्यावसायिक, अकोला.
वर्‍हाडी पदार्थ
‘थर्डी फस्ट’ला वर्‍हाडी पदार्थांची रेलचेल राहणार आहे. ग्राहकांची वर्‍हाडी पदार्थांना मागणी असते. त्यामुळे ग्राहकांना वर्‍हाडी पदार्थ उपलब्ध करून देण्यात येतील.
-अतुल देशमुख, हॉटेल व्यावसायिक, अकोला.
प्रशासनाचे महसुलाकडे लक्ष : जिल्ह्यात 250 परवानाधारक मद्यविक्रेते आहेत़ 31 ला मद्य विक्री होणार आहे. या विक्रीतून प्राप्त महसुलाकडे प्रशासनाचे लक्ष राहील.
शाकाहारी हॉटेल्स् व्यावसायिकही सज्ज : शाकाहारी हॉटेल्स् व्यावसायिकांनीही पनीरसह सर्व भाज्यांचे बुकिंग केले. काजू करी, पनीर मसाला, शेव भाजी, भेंडी फ्राय, ग्रीन पीस, डाल तडका आदी पदार्थांचा आस्वाद ग्राहकांना देण्यासाठी व्यावसायिक सज्ज झाले आहेत.