आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदाज: कावळ्यांचे घरटे अग्रभागी; यंदाही कमी पावसाचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- यंदा कावळ्यांनी आपले घरटे झाडांच्या अग्रभागी बांधले आहेत. त्यामुळे याही वर्षी कमी पाऊस होईल, असा अंदाज पक्षी अभ्यासक व्यक्त करत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
माणूस, वनस्पती, पक्षी हे निसर्गाचे भाग आहेत. यातील मनुष्यप्राणी हा माहिती गोळा करणे, मागील अनुभवावरून शिकणे, या गोष्टी करू शकतो. वनस्पती, पक्षी किंवा प्राणी ते करू शकत नाहीत. मात्र, त्यांना जन्मजात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग ते करत असतात. त्यांच्या वर्तणुकीत पावसाचे अंदाज दडलेले असतात, हे अभ्यासकांच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. आधुनिक युगात पावसासाठी पंचांग, वेधशाळा, ज्योतिष, पुस्तके, वृत्तपत्रे, अशा विविध प्रकारच्या गोष्टींचा आधार घेऊन पावसाचा अंदाज वर्तवतात. ग्रामीण भागातील अनेक भागांत वड, पिंपळ, निंब, अशी मुख्यत्वे झाडे असतात. अशा झाडांवर आता मोठ्या प्रमाणात कावळे घरटी बांधत आहेत. या घरट्यांचा पावसाचा अंदाज पूर्वापार चालत आलेला आहे.
यंदा एप्रिलपासून कावळ्यांनी झाडांवर घरटे बांधण्यास सुरुवात केली आहे. कावळ्यांची घरटी झाडांच्या मध्यभागी असतील, तर चांगल्या पावसाचे संकेत असतात. मात्र, या हंगामात परिसरात ज्या झाडांवर कावळ्यांनी घरटी बांधण्यास सुरुवात केली, ती झाडाच्या अग्रभागी, उंचावर आहेत. त्यामुळे यंदा कमी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संगणक युग असले तरी मध्येच पडणाऱ्या गारांचा वर्षाव, बेमोसमी पाऊस याची सूचना अद्याप तरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. मात्र, पाऊस यंदा कसा होईल, याचा अंदाज पशुपक्ष्यांच्या हालचालींवरून शेतकरी काढतात. त्यात टिटवी, कावळा यांनी शेतकऱ्यांना हवामान खात्यासारखे संकेत देणे सुरू केले आहे. यावर्षी पाऊस नसल्याचे संकेत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.
२७ नक्षत्रांच्या आधारेही अंदाज : महाराष्ट्रात २७ नक्षत्रांच्या आधारेही पावसाचा अंदाज वर्तवला जातो. पण, त्यातही अचुकता नाही. विषुववृत्तावर ३६० अंशांचा सरफेस येतो. त्याचे २७ भाग हे विशिष्ट गुणवत्तेच्या लहरी असताना तिथे निर्माण होतात. त्या गुणवत्तेच्या लहरींना नक्षत्रांचे नाव देण्यात आले आहे. घोडा, कोल्हा, बेडूक, मेंढा, मोर, उंदीर, म्हैस, गाढव आणि हत्ती ही नक्षत्रांची वाहने आहेत. सूर्य ज्या वेळी एखाद्या नक्षत्रात प्रवेश करतो, त्या वेळी चंद्र त्याच्यापासून कितव्या नक्षत्रात आहे. त्याच्यावर वाहन ठरते. समजा, चंद्र त्याच नक्षत्रात असेल तर घोडा वाहन येते. पुढच्या नक्षत्रात असेल तर कोल्हा वाहन येते.
पुढील स्लाइडसवर क्लिक करून वाचा, प्राणी पावसाविषयी कोण-कोणते संदेश देतात...