आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदा रेल्वेच्या ग्रीष्मकालीन गाड्यांचे नियोजन रखडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीमध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ग्रीष्मकालीन रेल्वेगाड्या सुरू करण्यात येतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांनंतर यंदा प्रथमच ग्रीष्मकालीन गाड्यांचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. यामुळे प्रवासी वर्ग या सुविधेपासून वंचित राहिला आहे.
रेल्वेमध्ये बारमाही प्रवाशांची मोठी गर्दी राहते. विशेष करून उन्हाळ्याच्या सुटीमध्ये तर रेल्वेत पाय ठेवण्यालाही जागा उरत नाही. या परिस्थितीमध्ये प्रवासी वर्गाला दिलासा देण्यासाठी अनेक विशेष रेल्वेगाड्यांचे प्रयोजन दरवर्षी केल्या जाते. तसेच नवरात्र, दिवाळी, नाताळ, नववर्ष याप्रसंगीसुद्धा सुट्यांमुळे होणारी गर्दी पाहता वेळोवेळी अशा गाड्या सुरू करण्यात येतात. बऱ्याच वर्षांपासून मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, बिलासपूर-पुणे, बिलासपूर-हापा, अमरावती-उधना फास्ट पॅसेंजर आणि लोकमान्य टिळक टर्मिनल-हटीया, लोकमान्य टिळक टर्मिनल-हावडा इत्यादी ग्रीष्मकालीन विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते. यंदाच अशा प्रकारच्या कोणत्याच रेल्वेगाड्या धावत नाहीत. प्रवासी या सुविधेपासून वंचित राहत असून, त्यांना होणारा त्रास रेल्वे प्रशासनाने उर्वरित काळामध्ये तरी या गाड्यांचे प्रयोजन करण्याची मागणी विदर्भ यात्री संघाचे अध्यक्ष डॉ. रवी अलिमचंदानी, अशोक अग्रवाल, डॉ. गद्रे, डॉ. कुळकर्णी, डॉ. वोरा, अॅड. मिश्रा आदींनी केली आहे.
एकमेव गाडीलाही प्रीमियमचा दर्जा
यावर्षी केवळ नागपूर-मुंबई ही एकच रेल्वेगाडी सुरू करण्यात आलेली आहे. या गाडीचा क्रमांक बदलून तिला प्रीमियमचा दर्जा देण्यात आलेला आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशाला या गाडीचा उपयोग होत नसून, तो या सेवेपासून वंचित झालेला आहे.
बातम्या आणखी आहेत...