आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजार शेतकं-यांना मिळणार विम्याची रक्कम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देऊळगाव साकर्शा - शासनाच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय पीक विमा योजनेमुळे शेतकं-यांना दिलासा मिळाला आहे. खरीप हंगाम २०१४-१५ या वर्षामधील ज्या शेतकंनी पीक विमा काढला, अशा शेतकंयांना पीक विम्याची मदत जाहीर झालेली असून, ती लवकरच शेतकंच्या खात्यात जमा होणार आहे.

मेहकर तालुक्यातील वरवंड महसूल मंडळांतर्गत हजार ८३९ शेतकंना २४ कोटी लाख ७९ हजार ९३३.४३ रुपये एवढी रक्कम वाटप केली जाणार आहे. ही रक्कम थेट शेतकंयांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याने शेतकंयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा अंतर्गत मागील खरीप हंगामातील ही रक्कम असून, योजनेमध्ये प्रामुख्याने कपाशी, मूग, ज्वारी, तूर, सोयाबीन या पिकांचा समावेश आहे. या वर्षी वरवंड महसूल मंडळ अंतर्गत, देऊळगाव साकर्शा, वरवंड, पाचदेवळा, घाटनांद्रा, पारखेड, पाथर्डी, वडाळी, मोहना, मांडवा, बोथा, मांडवा, बोथा, नायगाव देशमुख, उटी, गोमेधर, लोणीकाळे, बारडा, निंबा, मेळजानोरी आदी गावातील हजार ८३९ शेतकंयांना ही रक्कम दिली जाणार असून, त्यांच्याच बँक खात्यात ती जमा केली जाणार आहे. यात कपाशीसाठी हेक्टरी हजार ७७०.१०, मुगासाठी ४०६९.४४, ज्वारीसाठी हेक्टरी १७६०.४४, तुरीसाठी ५२२३.२६ सोयाबीनसाठी ८४०९.१४ मदत दिली जाणार आहे.

२०१४-१५ या वर्षात भरलेला विमा
- पीकअल्पभूधारकांनी भरलेला विमा भूधारकांनी भरलेला विमा
- कापूस ६८९ रुपये हेक्टर १३७८ रुपये हेक्टर
- मूग १५२ रुपये हेक्टर ३०३ रुपये हेक्टर
- ज्वारी १६८ रुपये हेक्टर २९६ रुपये हेक्टर
- तूर २३४ रुपये हेक्टर ४६८ रुपये हेक्टर
- सोयाबीन ३०१ रुपये हेक्टर ६०२ रुपये हेक्टर
अशी आहे आकडेवारी
- पीकक्षेत्र (हेक्टरमध्ये) शेतकरी मिळणारी रक्कम
- कापूस ३४६.५९ ५३३ २६९३२४९.१०
- मूग १८४.९० ५०३ ७५२४३८.९६
- ज्वारी ३६.२५ ९३ ६३८१५.९४
- तूर ३९७.९२ १३५४ १८६५३३४.९९
- सोयाबीन २३१९.५१ २३५६ १९५०५०९४.४४
शेतकंयांना किंचित दिलासा मिळणार
पीक विम्याची रक्कम लवकरच शेतकंयांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांपासून सततची नापिकी, त्यामुळे निघालेली कमी पीक आणेवारी, यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. आता किंचित दिलासा मिळणार आहे. प्रमोद दांदळे, तलाठी, दे.साकर्शा.

संकटातून उभारी मिळेल
मागीलवर्षी झालेल्या उत्पन्नाच्या घटीमुळे शेतकंयांवर संकट ओढवले होते. परंतु, आता मिळणा पीक विम्याच्या रकमेमधूून शेतकंना मदत नक्की मिळणार आहे. यामुळे संकटातून उभारी मिळणार आहे. मुनाफखाँ अतार, शेतकरी, देऊळगाव साकर्शा.
बातम्या आणखी आहेत...