आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारला अपघातात तीन ठार, मृत जळगाव जिल्ह्यातील, दोन भावांसह मेहुण्याचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर/ जामनेर - कारवरील ताबा सुटल्याने मलकापूरजवळील वाघूळ गावाजवळ झालेल्या कार अपघातात जामनेर येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्या भावांसह मेहुण्याचा समावेश असून अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेदरम्यान हा अपघात झाला.
भागवत शेनफडू गिते, श्रीकृष्ण धनराज घोंगडे, बाबूराव धनराज घोंगडे व सुदाम भिकन चौधरी हे शुक्रवारी सकाळी दत्तात्रय घोंगडे यांच्या कारने अकोला येथे साखपुड्याला जाण्यासाठी निघाले होते. मलकापूर सोडून नांदुरा रोड लागताच चालक दत्तात्रय घोंगडे यांचा ताबा सुटला व रस्त्याच्या कडेला ढाब्याला लागून असलेल्या एका सलूनच्या दुकानाला कारची जोरदार धडक लागली. ही धडक इतकी जोरात होती की, अर्धे दुकान जमीनदोस्त झाले. यात दत्तात्रय घोंगडे (वय ५८) व श्रीकृष्ण घोंगडे (६५) यांच्यासह भागवत गिते (६७) यांचा मृत्यू झाला.
अमेरिकेचे स्वप्न अधुरे

दत्तात्रय व श्रीकृष्ण घोंगडे हे पहूर येथील मूळ रहिवासी असून नोकरीनिमित्त ते जामनेर येथेच स्थायिक झाले आहेत. दत्तात्रय घोंगडे हे आयडीबीआय बँकेच्या मुक्ताईनगर शाखेत सहव्यवस्थापक आहेत. त्यांना तीन मुली असून धाकटीचा १५ दिवसांपूर्वीच साखरपूडा झाला. या लग्नासाठी थोरल्या मुलीला घेण्याकरिता घोंगडे हे सेवानिवृत्तीनंतर अमेरिकेला जाणार होते. मात्र, त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले.