आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Girl Safe After Fall On Three Floor Buildnig

तिसर्‍या मजल्यावरून पडली; दैव बलवत्तर म्हणून वाचली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - सकाळचे अकरा-साडेअकरा वाजले असतील. रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍यांची लगबग सुरू होती. दोन वर्षांची चिमुकली श्रेया घराच्या तिसर्‍या माळ्यावरील गच्चीवर खेळत होती. आई घरात कामे करण्यात व्यस्त. अचानक आवाज आला. धडाम ! पाठोपाठ र्शेयाची किंचाळी. आईच्या काळजाचा थरकाप उडाला. ती धावत बाहेर आली.

गर्दी जमलेली. बघते, तर श्रेयाच. पण ती सुखरुप होती. आईच्या जिवात जीव आला. देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण आहे. श्रेया त्याचं उदाहरण ठरली. विद्यानगरात दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना. या भागात प्रदीप ठाकरे परिवारासह राहतात. त्यांची दोन वर्षांची मुलगी श्रेया ही गच्चीवर खेळत होती. आई घरामध्ये कामात व्यस्त होती. खेळता-खेळता तोल जाऊन श्रेया खाली पडली. रस्त्याने जाणार्‍या एका व्यक्तिने तिला त्वरित उचलले. श्रेयाच्या तोंडाला मार लागल्याने थोडे रक्त आले होते. नगरसेवक गोपी ठाकरे व शेजारी नितीन कोष्ठी धावून आले. श्रेयाला रुग्णालयात नेण्यात आले. सिटी स्कॅन आदी तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी ती सुखरूप असल्याचे सांगितले.

श्रींच्या कृपेने वाचली श्रेया
श्रेयाला उपचारासाठी दोन-तीन हॉस्पिटल्समध्ये घेऊन गेलो. औषधोपचार घेतल्यानंतर तिला बरे वाटायला लागले. श्रेया बचावली ती ‘श्रीं’च्या कृपेमुळेच नितीन कोष्टी, शेजारी