आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणने तिघांना दिला निलंबन ‘शॉक’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मंगळसूत्र विकून लाचेची रक्कम दिल्यानंतरही चार वर्षांपासून वीजजोडणी मिळाल्याने सागद येथील शेतकरी दाम्पत्यावर कृषिदिनीच वीज कार्यालयातच विष घेण्याचा प्रसंग ओढवला. याप्रकरणी महावितरणच्या कारंजा रमजानपूर शाखेंतर्गतचे सहायक अभियंता, तंत्रज्ञ आणि बाळापूरचे उपकार्यकारी अभियंता, अशा तिघांसह अकोट नवीन वीजजोडणी विलंबप्रकरणी उपकार्यकारी अभियंता अशा चार कर्मचाऱ्यांना शुक्रवार, जुलै रोजी निलंबित करण्यात आले आहे.

बाळापूर तालुक्यातील सागद येथील शेतकरी दिलीप तायडे राधा तायडे या दाम्पत्याकडे दोन एकर शेती आहे. शेतीवरच तायडे कुटुंबातील सहा जणांचा उदरनिर्वाह सुरू आहे. गत काही वर्षांपासून शेतीचे उत्पन्न हाती आले नाही. अशा परिस्थितीत त्यांनी शेतीसाठी वीजजोडणी मिळावी, याकरिता पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून लाचेच्या रकमेची पूर्तता केली. मात्र, त्यानंतरही चार वर्षे लोटले असताना उर्वरित त्यांच्याशेतीची वीजजोडणी झाली नाही. यादरम्यान, महावितरणच्या कारंजा रमजानपूर कार्यालयात चकरा मारून, त्यांना निराशेने परतावे लागत होते. बुधवार, जुलै कृषिदिनी हे दोघे शेतकरी दाम्पत्य या कार्यालयात गेले. या वेळीसुद्धा त्यांना पुन्हा आठ हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली. त्यामुळे आपणाला न्याय मिळत नसल्याचे दिसून येताच नैराश्यामुळे दिलीप तायडे यांनी त्यांच्यापाठोपाठ राधा तायडे यांनी पतीच्या हातातील बॉटल हिसकावून घेत विष प्राशन करून कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तत्काळ या शेतकरी दाम्पत्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील दिलीप तायडे यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी बाळापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता पांडुरंग सांगोळे, कारंजा रमजानपूर शाखेचे तत्कालीन सहायक अभियंता आशिष गणगणे आणि तंत्रज्ञ चंद्रकांत इंगळे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच अकोट येथील ग्राहकाला उच्च दाबाच्या नवीन वीजजोडणीसाठी झालेल्या विलंबासाठी अकोला मंडळ कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता प्रभाकर दहापुरे यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी तत्काळ तक्रार करावी
महावितरण ग्राहक सेवेसंदर्भात कटिबद्ध गंभीर असून, ग्राहक सेवेत अथवा कृषिपंप जोडणीसाठी ग्राहकांना अनधिकृत पैशाची मागणी कुठल्याही कर्मचारी, ठेकेदार वा दलालांनी केल्यास महावितरणचे वरिष्ठ अधिकारी अथवा अधीक्षक अभियंता किंवा कार्यकारी अभियंता यांच्याकडे तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच मार्च २०१५ अखेर अनामत रकमेचा भरणा केलेल्या प्रलंबित अर्जदारांची ज्येष्ठता यादी सर्वच कार्यालयांमध्ये उपलब्ध असून, त्यातील अनुक्रमणिकेनुसारच वीजजोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे कुठलीही अफवा, खोटी माहिती वा आमिषाला बळी पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

कृषिपंपांसाठी निविदा प्रक्रिया सुरू
जिल्ह्यातील कृषिपंप जोडणीसाठी १४ कोटींची निविदा प्रक्रिया अाधीच पूर्ण झाली असून, सदर कामांचे आदेशही कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. सोबतच आणखी कृषिपंपांसाठी २० कोटी रुपयांच्या निविदेची प्रक्रिया सुरू असून, या माध्यमातून वीजजोडण्या देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४७ हजार २०८ कृषिपंपांच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. महावितरण शासकीय कंपनी असून, ग्राहकांना सेवा देण्यासाठी कार्यरत आहे. एखाद्या कर्मचाऱ्याच्या चुकी वा त्रुटीमुळे महावितरणच्या मालमत्तेला हानी पोहोचवू नये आणि ग्राहकांनी संयम राखून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी