आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन हजार विद्यार्थ्यांनी दिली एमपीएससीची परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सहायक पूर्वपरीक्षा 2013 रविवारी घेण्यात आली. या परीक्षेसाठी अकोला जिल्हय़ातील 3593 उमेदवारांनी एमपीएससीकडे ऑनलाइन अर्ज केले होते. त्यांपैकी 3078 उमेदवारांनी ही परीक्षा दिली, तर 515 उमेदवार या वेळी गैरहजर होते, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी दिली. एमपीएससी आणि अकोला जिल्हा न्यायालयाच्या कनिष्ठ लिपिकपदासाठी मराठी टंकलेखन परीक्षा एकाच दिवशी घेण्यात आल्याने अनेक विद्यार्थी एका परीक्षेपासून वंचित राहिले.

ही परीक्षा 16 केंद्रांवर घेण्यात आली. एमपीएससीच्या वतीने घेण्यात आलेली मंत्रालय सहायक आणि जिल्हा न्यायालय अकोला यांच्या वतीने घेण्यात आलेली कनिष्ठ लिपिकपदासाठी संगणकावरील टायपिंग परीक्षा एकाच दिवशी घेण्यात आली. अनेक विद्यार्थी दोन्ही परीक्षेसाठी पात्र होते. मात्र, त्यांना दोन पैकी एकच परीक्षा देता आली. शासनाच्या दोन विभागांमध्ये समन्वय नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. या परीक्षेसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे तीन समन्वय अधिकारी, 16 केंद्रप्रमुख पर्यवेक्षक 40, समावेशक 208 यांची अशी 272 अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्त करण्यात आली होती. परीक्षा शांततेत पार पडल्याची माहिती उपजिल्हाधिकार्‍यांनी दिली.