आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रकल्प मार्गी : वाघांच्या भीतीने 29 कि.मी. प्रवास लांबला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे अकोला ते खंडवा ब्रॉडगेजचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित होता. तो आता मार्गी लागला. व्याघ्र प्रकल्प व वाघांच्या भीतीने, बचावासाठी या ब्रॉडगेजची लांबी 29 किमी.ने वाढणार आहे. यासाठी नागपूरचे विभागीय रिमोट सेसिंग सेंटरची मदत घेतल्याची माहिती मिळाली.

पाच राज्यांना जोडणारा खंडवा ते अकोला रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये परावर्तीत करण्यासाठी मागणी होत आहे. आता नवीन प्रस्तावित मार्ग हा अडगाव बुद्रुकनंतर बदलून तुकईथडपर्यंत केला आहे. हा भाग व्याघ्र प्रकल्पातून जाणारा होता. पूर्णा येथून अकोला हा मार्ग मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये परावर्तीत झाला होता.अकोला ते खंडवा या मार्गात व्याघ्र प्रकल्पाची अडचण होती. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकल्प त्यामुळे प्रलंबित होता. दक्षिण रेल्वेने पर्यायी मार्ग शोधून सर्व बाजूंनी विचार करत नवीन रेल्वे मार्ग अडगाव बुद्रुक येथून हिवरखेड, सोनाळा, जामोद, उसरणी, खाकरनरकलम आणि खिर्खी या सहा नवीन गावांवरून जाणार आहे. शेवटी तो तुकईथड येथे जोडला जाईल. या अर्ध चंद्रकोर कृतीतून जाणार्‍या 29 किमी. लांबीच्या मार्गात साडेसहा किमी. लांबीचा बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे.

या मार्गाचे काम येत्या काही दिवसात सुरू होईल. तूर्तास खासदार संजय धोत्रे व दक्षिण रेल्वे मंडळाचे सदस्य अँड.एस.एस.ठाकूर यांनी त्याला मान्यता दिली आहे. या रेल्वे मार्गाने जयपूर व दिल्लीचा मार्ग सुकर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

केंद्राचा निर्णय
महू - खंडवा - अमल खुर्द- अकोट - अकोला या एकूण 472 किमी. लांबीच्या ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी 2008-2009 मध्ये केंद्र शासनाने मान्यता दिली होती. त्यानंतर यंदा यावर केंद्र सरकारने सुमारे 119 कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला.