अकोला - डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ गुरुवार, फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कृषी महाविद्यालय, अकोलाच्या परिसरातील दीक्षांत सभागृहात आयोजित केला आहे. विद्यापीठाचा हा दीक्षांत समारंभ म्हणजे एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो, असे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी सांगितले.
दीक्षांत समारंभाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंनी विद्यापीठाने मिळवलेल्या यशासोबत समारंभाची माहिती दिली. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कृषी फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय, महसूलमंत्री तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती एकनाथराव खडसे हे राहतील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोहळ्याला प्रमुख उपस्थिती राहील. याशिवाय डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोलीचे माजी कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी हे स्वागतपर भाषण अहवाल वाचन करतील.
१,५७०स्नातकांना मिळणार पदव्या : यादीक्षांत समारंभामध्ये १,५७० स्नातकांना विविध पदव्या प्रदान केल्या जातील. यामध्ये कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, अन्नशास्त्र, कृषी अभियांत्रिकी अशा पदव्यांचा समावेश असेल.
२५ जणांना आचार्य पदवी मिळणार
(डॉक्टरआॅफ फिलॉसॉफी) आचार्य पदवी ही २५ जणांना दिली जाईल. याशिवाय प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात येतील.
पदके बक्षिसे
सुवर्णपदके- २८
रौप्यपदके - १६
रोख बक्षिसे - ३६
पुस्तक स्वरूपात बक्षिसे -
एकूण ८३