आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवयानी खोब्रागडे शनिवारी अकोल्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विदेश मंत्रालय, दिल्ली येथे कार्यरत पाकिस्तान, अमेरिका, जर्मनी, इटली या देशात भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या आयएफएस देवयानी खोब्रागडे शनिवार, २० डिसेंबरला अकोल्यात येत आहेत.
विशेष म्हणजे देवयानी खोब्रागडे यांनी अकोला येथे तीन वर्ष शालेय शिक्षण घेतले असून, त्यांना अकोल्याप्रति जवळीक आहे. प्रमिलाताई ओक सभागृहात दुपारी ४.३० वाजता होणारे व्याख्यान केंद्र महाराष्ट्र राज्य प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या परीक्षार्थींकरिता नि:शुल्क राहील. याप्रसंगी उपजिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, सुधाकर राठोड, संचालक अ‍ॅग्रोरिअन यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. सदर व्याख्यान पवन माहेश्वरी, संचालक माहेश्वरी बायोफ्युअल्स यांनी आयोजित केले असून, अ‍ॅग्रोरिअन करिअर पॉइंट यांनी प्रायोजित केले आहे. तरी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.