आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळाबाह्य बालकांसंदर्भात सर्वेक्षणासाठी उद्या "अिभयान'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदुरा - शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यातील शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभाग क्रीडा विभागाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार तालुक्यात शनिवार, चार जुलै रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या अनुषंगाने गुरुवार, दोन जुलै रोजी तालुकास्तरावर सर्वेक्षणपूर्व प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.

श्रीमती तु. र. झांबड इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये आयोजित सर्वेक्षण अधिकारी झोनल अधिकाऱ्यांच्या या प्रशिक्षण वर्गाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी एस. ए. मारकड होते. गटशिक्षणाधिकारी के. डी. पडोळ, नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी जे. डी. झिने, विस्तार अधिकारी अनिल तरमळे, रमेश वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. गटशिक्षणाधिकारी के.डी. पडोळ यांनी या वेळी उपस्थितांना प्रत्यक्ष करावयाच्या कामाचे स्वरूप समजावून दिले. गटविकास अधिकारी एस. ए. मारकड यांनीही मार्गदर्शन केले. तालुक्यात घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणे बाजार आदी ठिकाणी फिरून सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. हे कामकाज तालुका समितीद्वारे होणार असल्याचेही सांगितले.

समाजातील ते १४ वयोगटातील प्रत्येक बालक शाळेत गेल्याशिवाय आणि नियमित शाळेत उपस्थित राहून दर्जेदार शिक्षण घेतल्याशिवाय शिक्षण हक्क कायद्याला पूर्णत्व प्राप्त होणार नाही. समाजातील तळागाळातील प्रत्येक बालक शाळेत जावे, शिकावे या उद्देशाने शाळाबाह्य असलेल्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. विविध पातळ्यांवर शाळाबाह्य मुलांच्या संख्येविषयी एकवाक्यता नाही. शिक्षण हक्क अधिनियमानुसार ही व्याख्या अशी स्पष्ट करण्यात आली आहे. ज्यांनी शाळेत प्रवेश घेतला नाही किंवा ज्यांनी प्रवेश घेवून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले नाही अशा ते १४ वयोगटातील बालकांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये एक महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित राहणाऱ्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होतो, असे या वेळी सांगण्यात आले.

बोटाला लागणार शाई
एकही शाळाबाह्य बालक सर्वेक्षणात नोंदवायचे राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. सर्वेक्षित बालकाच्या बोटाला शाई लावण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण निवडणुका किंवा पोलिओ अभियानाप्रमाणे पूर्ण केले जाईल.

असे राहणार नियोजन
नांदुरा तालुक्यात ग्रामीण भागासाठी २६० सर्वेक्षण अधिकारी झोनल अधिकारी १३, नगरपालिका विभागासाठी ६५ सर्वेक्षण अधिकारी झोनल अधिकारी राहतील. तालुक्यात ६५ ग्रामपंचायती, १०२ गावे एक नगरपालिका आहे.

१०० कुटुंबांसाठी एक सर्वेक्षण अधिकारी
साधारणत:१०० कुटुंबांसाठी एक सर्वेक्षण अधिकारी, २० सर्वेक्षण अधिकाऱ्यांवर एक झोनल अधिकारी २० झोनल अधिकाऱ्यांवर एक नियंत्रक अधिकारी अशी रचना राहणार आहे.
एक दिवसीय सर्वेक्षणाचे नियोजन

हेसर्वेक्षण सूक्ष्म असून प्रत्येक गावातील, शहरातील प्रत्येक घराला भेट देऊन शाळाबाह्य बालक आहे का, याची माहिती घेण्यात येणार आहे. प्रत्येक घर, गजबजलेल्या वस्त्या, रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाजार, गावाबाहेरची पाले, विटभट्ट्या, बांधकामे, स्थलांतरित कुटुंबे, झोपड्या, फुटपाथ, तमाशा कलावंतांची वस्ती, अस्थायी निवारा, तेंदूपत्ता कामगार वस्ती, बालमजूर, उसतोड कामगार वस्त्या, शेतावरील कामगार वस्त्या या अशा ठिकाणी सर्वेक्षण केले जाणार आहे.