आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tourism Center Proposal,Latest New In Divya Marathi

कापशी तलाव पर्यटन केंद्राचा प्रस्ताव पाठवला एमटीडीसीकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ‘क्लीन अकोला-ग्रीन अकोला’ या मिशन अंतर्गत शहरात विविध योजना राबवतानाच अकोलेकरांसाठी जवळचे एकमात्र सहलीचे ठिकाण असलेल्या कापशी तलाव पर्यटन केंद्राचा प्रस्ताव आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी एमटीडीसीकडे पाठवला आहे. एमटीडीसीने हिरवी झेंडी दिल्यानंतर नागरिकांना कुटुंबासह सहलीला जाण्यासाठी एक पर्यटन केंद्राची सोय होणार आहे. शहराची लोकसंख्या वाढल्यानंतर नागरिकांना पाणीपुरवठय़ासाठी कापशी तलाव खोदण्याचा निर्णय 1890 मध्ये तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने घेतला होता. या तलावातून शहराला सन 1920 मध्ये प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाला. या तलावातून 1980 पर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला.
पुढे कौलखेड पाणीपुरवठा योजना व काटेपूर्णा प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर कापशी तलाव पाणीपुरवठा योजनेकडे दुर्लक्ष झाले. एकूण 700 एकर जागेपैकी 350 एकरांवर तलाव आहे. तलावालगत उद्यान तसेच गेस्ट हाऊस तयार करण्यात आले होते. शहरातील नागरिक सहलीसाठी कापशी तलावावर येत असत. त्या वेळी बोटिंगची व्यवस्था होती. परंतु, कापशी तलाव योजना बंद झाल्यानंतर तलावाकडेच दुर्लक्ष करण्यात आले. परंतु, तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे, उपायुक्त व्ही. बी. ढोले यांनी तलावालगत असलेल्या जागेतील वाढलेली झाडे काढण्याचे काम हाती घेऊन उद्यानात झाडेही लावली होती. परंतु, पुन्हा या तलावाकडे दुर्लक्ष झाले. काही दिवसांपूर्वी आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपमहापौर रफिक सिद्दीकी यांनी कापशी तलावाची पाहणी करून कापशी तलवाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने या अनुषंगाने सौंदर्यीकरण, पर्यटन केंद्राचा प्रस्ताव एमटीडीसीकडे पाठवला आहे.