आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कापशी तलावाला लवकरच येणार पर्यटन केंद्राचे स्वरूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एकेकाळी शहराला पाणीपुरवठा करणारा तसेच अकोलेकरांसाठी सहलीचे एकमात्र ठिकाण असलेल्या कापशी तलावाचे सौंदर्यीकरण करून या तलावाला पर्यटन म्हणून विकसित करण्याचा निर्णय प्रशासन आणि पदाधिकार्‍यांनी घेतला आहे. यानुषंगाने लवकरच निविदा बोलावण्यात येणार आहे.
एकूण 700 एकर जागेपैकी 350 एकरांवर तलाव आहे. शहराला पाणीपुरवठा होत असताना तलावालगत उद्यान तसेच गेस्ट हाऊस तयार करण्यात आले होते. शहरातील नागरिक सहलीसाठी कापशी तलावावर येत असत. त्या वेळी बोटिंगचीही व्यवस्था होती. परंतु, कापशी तलाव योजना बंद झाल्यानंतर तलावाकडेच दुर्लक्ष करण्यात आले. परंतु, तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे, उपायुक्त व्ही. बी. ढोले यांनी तलावालगत असलेल्या जागेतील वाढलेली झाडे काढण्याचे काम हाती घेऊन उद्यानात झाडेही लावली होती. तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांना या जागेत सुई बाभळीची शेती करून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करायचा होता. बदलीमुळे सर्व थंडबस्त्यात पडले.

परंतु, तत्कालीन उपायुक्त उमेश कोठीकर यांनी राज्य शासनाकडून तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. महापालिकेला साडेतीन कोटींचा पहिला हप्ताही प्राप्त झाला होता. परंतु, तत्कालीन आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी योजनेसह निधी शासनाकडे परत पाठवला. आता उपमहापौर रफिक सिद्दीकी आणि आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तलावाच्या सौंदर्यीकरणाचा मुद्दा हातात घेतला आहे. यानुषंगाने गुरुवारी उपमहापौर व आयुक्त यांनी तलावाची सयुक्तरीत्या पाहणी केली. यात बोटिंगसह लहान मुलांसाठी विविध खेळणी, साहित्य ठेवणार आहेत.