आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉवरच्या बॅटरी चोरीचे इंदूर ‘कनेक्शन’ उजेडात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मोबाइल फोन कंपनीच्या टॉवरची बॅटरी चोरीचे इंदूर ‘कनेक्शन’ उजेडात आले आहे. चोरीच्या बॅटरीमधील धातू इंदूर येथे विक्री करण्यात येते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदूर येथील टोळीला अटक केली. या कंपनीचे टेक्निशियनच बॅटरी बाहेर काढून तशी ‘टिप्स’ चोरट्यांना देत होते.

सहा जण दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने अकोट रोडवर सोमवारी ‘फिल्डिंग’ लावली. पोलिसांनी इम्रानअली शहजाद अली, रियाजउद्दीन कुतुबउद्दीन, मोहंमद शफी मोहंमद युनूस, शेख बबलू शेख इस्माईल, अजीज खान गजफ्फर खान, नसीर खान अजमल खान यांना अटक केली होती.

दरम्यान, बुधवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुभाष माकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकुमार मिर्शा, एएसआय मधुकर वाघाळकर, शेख हसन, रफिक करत आहेत. शहरात इतरत्रही मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलिस या गुन्ह्याच्या तपासाच्या निमित्ताने या चोरींच्या घटनांचाही छडा लावत आहेत.