आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक गुन्हे शाखा अन् ‘ऑल वुमन मोबाइल पेट्रोलिंग’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळणे, छेडखानीला रोखण्यासाठी 2013 मध्ये पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला. फसवणुकीच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेची स्थापना केली. याशिवाय ‘ऑल वुमन मोबाइल पेट्रोलिंग’ सुरू करण्यात आले.
अकोल्यात आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. 2013 मध्ये सिंडीकेट, देना बँक, र्शीसूर्या फायनान्स इन्व्हेंस्टमेंट कंपनी, अकोला अर्बन बँकेतील कोट्यवधींचे घोटाळे उजेडात आले. मनपा, जिल्हा परिषदेसह दुय्यम निबंधक कार्यालयातही खरेदी-विक्रीत फसवणुकीच्या घटनाही झाल्या. आर्थिक गुन्ह्यांच्या तपासासाठी वेळ द्यावा लागतो. त्यासाठी तज्ज्ञही हवेत. याचा विचार करून आर्थिक गुन्हे शाखेची स्थापना झाली. या शाखेच्या प्रमुखपदी पोलिस निरीक्षक राजेश भुयार यांची नियुक्त झाली. या शाखेत पाच कर्मचारी आहेत.

बेताल वाहतुकीस ‘इनकॅमेरा’चाप
बेताल वाहतुकीला चाप लावण्यासाठी 2013मध्ये पोलिस प्रशासनाने उपाययोजनाही केल्या. नियम मोडणार्‍यांविरोधात मोहीम राबवली. यात आड येणार्‍या ‘नेतेगिरीला’ रोखण्यासाठी शहर कोतवाली पोलिसांनी कारवाईचे चित्रीकरण केले. त्यामुळे अनेकांनी कारवाईत हस्तक्षेप न करता दंड भरला.

ऑल वुमेन पेट्रोलिंग
महिला, मुलींच्या सुरक्षेबाबतही पोलिस प्रशासनाने सकारात्मक प्रयत्न केले. छेडखानी रोखण्यासाठी ‘ऑल वुमन मोबाइल पेट्रोलिंग सुरू केले. यात सहायक पोलिस निरीक्षक विल्हेकर यांच्यासह महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल आणि तीन पोलिस हेड कॉन्स्टेबलची नियुक्ती केली.