आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक पोलिसांच्या कृपेने धावतात नंबर नसलेली वाहने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- वाहन खरेदी केल्यानंतर त्याच दिवशी नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, वाहनधारकांकडून दोन -तीन महिने नोंदणीच केल्या जात नसल्याने शहरातील रस्त्यांवर नोंदणी क्रमांक नसलेली वाहने धावत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष करण्यात येत आहे.
शहरातील चौकात शुक्रवारी केलेल्या पाहणीत एका तासामध्ये एका चौकातून क्रमांक नसलेली सात वाहने दिसून जातात. यावरून क्रमांक नसलेली किती वाहने या रस्त्यांवरून धावत असतील, याचा अंदाज येतो. या वाहनधारकांना वाहतूक पोलिसांची कोणतीही भीती वाटत नाही. नोंदणी क्रमांकाशिवाय धावणार्‍या या वाहनांमुळे कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बर्‍याचदा गाडी खरेदी करताना कर्ज घेतल्या जाते. त्यात चेक वेळेवर मिळत नाही, तरीदेखील मोटारसायकलची विक्री केली जाते. मात्र, पैसे मिळालेले नसल्यामुळे नोंदणी करण्यास विलंब होतो. त्यामुळे क्रमांकाशिवाय गाड्या धावतात.
आरटीओकडून कारवाई नाही
वितरकांकडून मोटारसायकल विक्री केल्याच्या दिवशी नोंदणी करून घेण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. याशिवाय वितरक किंवा ग्राहकांकडून विलंब होत असल्यास कारवाई न करताच उशिराने नोंदणी करून देतात. परिणामी, वितरक व ग्राहक मनाप्रमाणे नोंदणी करतात. मात्र, अशा प्रकरणात आरटीओ कार्यालयातर्फे कारवाई झालेली नाही.
काय म्हणतो कायदा
कोणतीही मोटारसायकल खरेदी केल्यास त्वरित आरटीओ कार्यालयात मोटार वाहन कायद्यानुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे तसेच नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल आढळल्यास संबंधित वाहनधारकावर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यासाठी 100 रुपये दंड आकारल्या जातो