आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई, पुणे, दिल्लीकडे जाणार्‍या गाड्या 14 जूनपर्यंत फुल्ल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- उन्हाळ्याच्या सुटीचे दिवस असल्याने रेल्वेस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. मुंबई, पुणे, सुरत, दिल्लीकडे जाणार्‍या रेल्वेचे आरक्षण 14 जूनपर्यंत फुल्ल झाले आहे. जादा पैसे मोजूनही तिकीट मिळत नसल्याने सहकुटुंब विनाआरक्षण प्रवास करणार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे अनेक जण अव्वाच्या सव्वा पैसे मोजून मिळेल त्या वाहनाने प्रवास करताना दिसून येत आहेत.
बहुतांश रेल्वे गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. विदर्भ, सेवाग्राम, हावडा-मुंबई गीतांजली, अमरावती-मुंबई सुपरफास्ट, मुंबई-हावडा मेल व्हाया अलाहाबाद, आझाद हिंद, महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे-हटिया, पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस, अहमदाबाद-सुरत प्रेरणा एक्स्प्रेस, सुरत-मालदा, चेन्नई -नवजीवन सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये तर वेटिंग लिस्ट 114 पर्यंत पोहोचली आहे. नागपूर-मुंबई, नागपूर-हावडा, अहमदाबाद- सुरत या मार्गावर एक एप्रिलपासून हॉली डे स्पेशल गाड्या सुरू झाल्या आहेत. 30 जूनपर्यंत त्या धावणार आहेत. त्यांचाच ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणार्‍या प्रवाशांना आधार उरला आहे. दरम्यान, गाडीत आरक्षण मिळत नसल्यामुळे बाहेरगावी जाऊन पर्यटनाचा आनंद आणि देवदर्शन करणार्‍यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. तत्काळ तिकीट विक्री सकाळी आठ वाजेपासून सुरू होते. मात्र, त्यासाठी सकाळी सहापासून रांग लागलेली असते. दोन तास रांग लावूनही तत्काळ तिकीट मिळेलच, याची हमी नाही.