आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Transport Corporation Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिवहन महामंडळाच्या बसेस टाकताहेत कात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गेल्याअनेक वर्षांपासून विभागातील खिळखिळ्या झालेल्या एसटी महामंडळाच्या बसेसची नागपूर कार्यशाळेत पुनर्बांधणी होत आहे. एसटीच्या पुनर्बांधणीमुळे एसटी बसेस आपली कात टाकत आहे. याचा फायदा एसटीच्या उत्पन्न वाढीवर होणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मागील अनेक वर्षांपासून खिळखिळ्या अवस्थेत रस्त्यांवर धावत आहेत. नादुरुस्त बसेसमुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, गेल्या काही वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळ तोट्यात चालत आहे. नादुरुस्त झालेल्या बसेसमध्ये असलेली बैठक व्यवस्थेची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक बसेसच्या छताचा पत्रा क्षतिग्रस्त झाल्याने पावसाळ्यात छताला गळती लागली होती. त्यामुळे प्रवासादरम्यान बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना भिजावे लागत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. महामंडळाच्या नादुरुस्त बसेसचा विपरीत परिणाम ग्रामीण भागातून नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, तर याचा विपरीत परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. महामंडळाचे विभाग नियंत्रक अजय सोले यंत्र अभियंता मधुकर सोनोने यांच्या परिश्रमाने एसटी बसेसची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून या कार्याला प्रारंभ झाला असून, विभागातील डेपोच्या बसेस टप्प्याने नागपूर येथील मध्यवर्ती कार्यशाळेत पाठवण्यात येत आहेत. नादुरुस्त अवस्थेत असलेल्या एसटी बसेस पूर्णपणे दुरुस्त करण्यात येत आहेत. एसटीच्या पुनर्बांधणीमुळे खिळखिळ्या झालेल्या बसेस आता ठणठणीत होऊन पुन्हा रस्त्यांवर धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशी संख्येत वाढ होऊन एसटीला चांगले दिवस येतील अशी आशा आगारप्रमुख ए. एम. शेंडे यांनी व्यक्त केली आहे.
प्रवाशांची संख्या वाढण्यास होईल मदत
खिळखिळ्याबसेसची नव्याने पुनर्बांधणी होत असल्याने बसेसची अवस्था चांगली होणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊन एसटीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.'' ए.एम. सोले, विभागनियंत्रक. विभागातील बसेसची पुनर्बांधणी.