आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज 31 हजार प्रवासी करतात एसटीचा प्रवास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मध्यवर्तीबसस्थानक प्रवाशांनी नेहमीच गजबजलेले असते. या बसस्थानकावरून दररोज 31 हजार 300 लोक प्रवास करतात. दिवसभरात 711 बसेसची स्थानकावरून ये-जा होत असते. आपला प्रवास सुकर व्हावा, म्हणून अनेक प्रवासी बसच्या प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळेच बसचा प्रवास करणाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील सर्वच लहान मोठी खेडी परिवहन महामंडळाने जोडली आहे. मध्यवर्ती बसस्थानकावरून दिवसाला ये-जा करणा-या बसेसमधून दररोज 31 हजार 300 प्रवासी म्हणजेच महिन्याला जवळपास लाख ४० हजार प्रवासी एसटी बसचा प्रवास करतात. यामध्ये रात्रीचा केवळ तास बसस्थानकामध्ये शांतता असते, तर रात्री बारानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशीचे नियमित चक्र सुरू होते. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत भरच पडत अाहे.
^बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात यातायात असून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे रोज विविध समस्या निर्माण होतात. त्या दूर करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाच्या वतीने नियमित सुरू असतो.'' ए.एम. शेंडे, आगारव्यवस्थापक
या मार्गावर जास्त फे-या
मध्यवर्ती बसस्थानकावर येतात दिवसभरात 711 बसेस; सर्वात जास्त गाड्या शेगावसाठी
या आहेत समस्या : मध्यवर्तीबसस्थानकावर रोज मोठ्या प्रमाणात बसेसचे अावागमन होते. मात्र, प्रवेशद्वारासमोरच ऑटो उभे असल्याने बसला ये-जा करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, तर दुसरीकडे बसस्थानकात खासगी वाहनांची ये-जा अवैध पार्किंगची समस्या आहे.
उभे राहून प्रवास : प्रवाशांचीवाढती संख्या पाहता असलेल्या बसेस कमी पडत आहेत. परिणामी, प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे.

श्री क्षेत्र शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी अनेक नागरिक जातात. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकातून जवळपास 47 हून अधिक बस फेऱ्या शेगावला होतात. याव्यतिरिक्त दर्यापूर, अकोट, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, वाशीम, यवतमाळ या मार्गावरही अनेक बस फेऱ्या होतात.