आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांसमोरूनच अवैध वाहतूक सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोटफैल पोलिस ठाण्यासमोरून दररोज अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. मात्र, या वाहतुकीला पोलिसांचा अभय असल्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
अकोटफैल पोलिस ठाण्यासमोरून सरासरी दर 15 मिनिटाला एक वाहन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाताना एका पाहणीत दिसून आले. पोलिसांचा धाक नसल्यामुळे किंवा अवैध वाहनधारकांशी त्यांचे मधुर संबंध असल्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करण्यास पोलिस धजावत नाहीत, तर काळी-पिवळी, ऑटोरिक्षा यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून दुचाकीधारकांवर कारवाई केल्या जात असल्याचे दिसून येते.
सोमवारी दुपारी 1.10 मिनिटांपासून 2.20 वाजेपर्यंत पोलिस ठाण्यासमोरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणार्‍या वाहनांची पाहणी केल्यानंतर सहा वाहने जाताना दिसून आली. यापैकी काही पाच काळीपिवळीमध्ये 15 ते 20 प्रवासी होते, तर चालकाच्या बाजूलाच तीन ते चार प्रवासी बसलेले होते. या सर्व सहाही वाहनांकडे पोलिसांनी साधे ढुंकूणही पाहले नाही.