आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्याच्या एसपींच्या निवासस्थानी वृक्षतोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - झाडे लावा, झाडे जगवा, असा संदेश शासन देत असले तरी, पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या परिसरात मात्र वृक्षतोड झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या वृक्षतोडीबाबत शासन यंत्रणेकडून ना परवानगी घेण्यात आली, ना त्यांना कळवण्यात आले.

मूर्तिजापूर रस्त्यावर विस्तीर्ण जागेत ‘उदय’, हे पोलिस अधीक्षकांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी सहा वृक्षांची तोड करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये दोन भिंगरी आणि दोन धाडसह अन्य दोन झाडांचा समावेश आहे. वृक्षतोडीमागील प्रयोजन मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

दुसर्‍यास सांगे ब्रह्मज्ञान..
दोन महिन्यांपूर्वी पोलिस अधीक्षक कार्यालयाने सर्व ठाणेदारांना वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपनाबाबत पत्र दिले होते. प्रत्येक पोलिस ठाण्याने 25 झाडांचे वृक्षारोपण आणि संगोपन करणे अपेक्षित होते. मात्र, आता पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानी वृक्षतोडीचा प्रकार उजेडात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पोलिस अधीक्षकांचे ‘नो कॉमेंट्स’
वृक्षतोडीबाबत पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.