आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी समाजातर्फे मालेगावात रास्ता रोको

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - आदिवासी समाजातर्फे शुक्रवारी दुपारी १२ वाजता तब्बल तासभर रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. अनुसूचित जमाती प्रवर्गात असणाऱ्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, तसेच अनुसूचित जमातीत धनगर समाजालाही आरक्षण देण्याबाबतच्या शरद पवार यांच्या त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आदिवासी समाजाच्या वतीने हा रास्ता रोको करण्यात आला. विश्रामगृहासमोरील प्रांगणात शेकडो आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर शासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा शेलूबाजार फाट्यावर आल्यावर त्याचे रूपांतर रास्ता रोकोत झाले. तब्बल तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे वाशीम मार्गावरील शेलू फाटा तसेच मालेगाव व शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. या वेळी माजी प्राचार्य भीमराव लोखंडे म्हणाले की, आदिवासी समाज या देशाचा मूळनवासी आहे. त्यांच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणात इतर कुणाचीही घुसखोरी सहन केली जाणार नाही, असे ठणकावले. माजी सदस्य सुनील गोरमले यांनी शरद पवारांनी बेलगाम वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
२३ जणांना अटक : या रास्ता रोको आंदोलनात भीमराव लोखंडे, सुनील गोदमले, बंडू शेळके, शेषराव पांडे, जगदेवराव ढंगारे, नामदेव करवते, गोपाल गाढे, गजानन गिर्हे, सुखनंदन नांदे, दिलीप भुरकाडे, विठ्ठल धन्वरे, सुखदेव डुकरे, कैलास तिवाले, रघुनाथ भुरकाळे, गजानन लठाड, महादे;व शेळके, हरिदास लाेखंडे, रमा जामकर, नामदेव ठाकरे, रामेश्वर शेळके, प्रभू शेळके, महादेव पवार आदी शेकडो समाजबांधवांचा सहभाग होता. पोलिसांनी रास्ता राेको करणाऱ्या २३ जणांना पोलिसांनी अटक केली.