Home | Maharashtra | Vidarva | Akola | tribute paid to kisoredada more by noted personalities

व्यर्थ मी केली प्रतीक्षा, तू तरी येशील हा विश्वास होता..

प्रतिनिधी | Update - Sep 29, 2013, 12:52 PM IST

स्व. किशोरदादा मोरे यांना विविध मान्‍यवरांनी स्वरसुमनांनी वाहिली आदरांजली

 • tribute paid to kisoredada more by noted personalities

  अकोला- ‘चालणार्‍याला बोलणार्‍याचा वास होता

  तू तिथे होतास तो भास होता

  व्यर्थ मी वेड्यापरी केली प्रतीक्षा

  तू तरी येशील हा विश्वास होता..’


  गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांनी कवी सुरेश भट यांच्या आठवणींना उजाळा देत अनोख्या अंदाजात या आणि अशा विविध गझल सादर केल्या. भाग्यश्री पांचाळे यांनीही ‘मी किनारी सरकताना पाहिले..’ ही गझल सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली. निमित्त होते प्रसिद्ध साहित्यिक स्व. किशोरदादा मोरे यांचा स्मृतिसोहळ्याचे. शनिवारी प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित या कार्यक्रमात सादर गझल आणि मुशायरीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

  मुंबई येथील गझलसागर प्रतिष्ठान आणि अकोला येथील ललित कला अकादमीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ख्यातनाम सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ‘किशोरदादा मोरे : एक वाड्मयीन प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले.

  दादांसारखे जिणे जगावे
  स्व. मोरे यांना वाचावे, समजून घ्यावे, इतरांनाही वाचायला द्यावे. त्यातून आपले जीवन कसे सफल होईल याचा विचार करावा, असे मत सिनेदिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केले. दादा नसते तर देवकीनंदन जसा झाला तसा झालाच नसता. त्यांच्या जीवनातून अनुभवलेल्या गोष्टी आदर्श शिकवण म्हणून प्रत्येकाने स्वीकाराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

  गझलने जिंकले

  पंडित भीमराव पांचाळे यांनी ‘शब्दसुरांची भावयात्रा’ या वेळी सादर केली. हास्यकवी किशोर बळी यांनी निवेदन केले. सुधाकर आंबुसकर, डॉ. देवेंद्र यादव, प्रशांत अग्निहोत्री, संदीप ठाकूर, सुमीत आंबुसकर यांनी गझलला साथ दिली.

  कथावाचन
  आकाशवाणीचे निवेदक संजय ठाकरे आणि निवेदिका सीमाताई रोठे यांनी या वेळी कथावाचन केले. प्रेक्षकांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली.

  या कलावंतांनी सजवला मुशायरा
  मुशायर्‍याच्या अध्यक्षस्थानी भंडारा येथील प्रल्हाद सोनेवाने होते. सूत्रसंचालन पवन नालट व नितीन देशमुख यांनी केले. लक्ष्मण जेवणे (नेरपिंगळाई), प्रफुल्ल बुजाडे (वरुड), नितीन देशमुख (चांदुरबाजार), मसूद पटेल (पुसद), आवेद शेख (महागाव), गजानन दरोडे (महागाव), विद्यानंद हाडके (आर्वी), प्रमोद चोबितकर (खामगाव), मंगेश गजभिये (बार्शिटाकळी), संघमित्रा खंडारे (दर्यापूर), रमेश सरकाटे (मुंबई), सुबोध निवाणे व पवन नालट (अमरावती), सुनील देशपांडे व प्रकाश मोरे (अकोला) यांनी सहभाग घेतला.

Trending