आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकची दुचाकीला धडक; एक जण ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळापूर- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - 6 वर रिधोरा बाहय़वळण मार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी 8 मार्चला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली.
प्रमोद नामदेव तायडे (वय 30),सलीमखान सनाउल्लाखान (वय 28) रा. देगाव हे दोघे अकोल्याला कामानिमित्त आले होते. काम आटोपून ते एम.एच. 30 ए.जी.4605 या दुचाकीने देगावला जाण्यासाठी दुपारी 2.45 वाजता अकोल्याहून निघाले. रिधोरा येथील बाहय़वळण मार्गावरून चुकीच्या दिशेने वळण घेताना मुंबईहून जमशेदपूरकडे जाणार्‍या ट्रक एम.एच.04एफ पी.6271 ने त्यांना धडक दिली. या धडकेत प्रमोद नामदेव तायडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सलीमखान सनाउल्लाखान हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रकचा चालक फरार झाला आहे.