आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोड्यात टाकणारी 28 लाखांची चोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-बोरगाव- राष्ट्रीय महामार्गावर बाभुळगाव ते वाशिंबा दरम्यान असलेल्या एमआरएफ टायर कंपनीच्या गोडाउनमध्ये बुधवारच्या रात्री चोरी झाली. 28 लाख रुपये किमतीचे 173 टायर या गोडाउनमधून चोरी झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. मात्र, पोलिसांच्या तपासामध्ये हे टायर कसे नेले याचे कोडे उलगडले नसल्यामुळे पोलिसापुढे तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे.
राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या या गोडाउनमध्ये ट्रक आणि ट्रॅक्टरचे टायर आहेत. संपूर्ण जिल्हाभर या गोडाउनमधून टायरचे वितरण होते. बुधवारच्या रात्री या गोडाउनमध्ये एक रात्रपाळीचा सुरक्षा रक्षक गोपाल गौरकर होता. मात्र, या सुरक्षा रक्षकाला चोरीची काहीही भणक नव्हती. येथून 173 टायर चोरी गेल्याचे गोडाउनचे मॅनेजर बीनीई एलियास यांना गुरुवारी सकाळी दिसून आले. त्यांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार दिली. ठाणेदार डी. के. अव्हाळे यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.