आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकने मागून पिकअपला दिली धडक, गायीसह दोन जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू- राष्ट्रीय महामार्गावर राजापूर बसथांब्याजवळ एका पिकअपचा चालक गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना पाठीमागून येणाऱ्या पिकअपला ट्रकने धडक दिली. ही घटना मंगळवार, १२ मे रोजी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये गायीसह दोन जण जखमी झाले आहेत.
बोरगावमंजूकडून मूर्तिजापूरकडे कंपनीची पिकअप एमएच ०२, टीसी ८२० ही तीन प्रवासी वाहून नेत असताना अचानक एक गाय वाहनाच्या समोर आली. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ब्रेक लावून वाहन नियंत्रणात आणून बचाव करत असतानाच पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्रमांक सीजी ०४ जेडी ९८१३ ने पिकअपला धडक दिली. या अपघातात पिकअपमधील प्रवासी जाकिया परवीन अ. राजीक वय ३० बंटी अ. राजीक वय १२ हे दोघे जखमी झाले, तर वणीरंभापूर येथील एक गाय गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने जीवित हानी टळली असली तरी गायीसह पिकअप महिंद्रा गाडीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती बोरगावमंजू पोलिसांना मिळताच हेडकॉन्स्टेबल संतोष तिवारी, प्रकाश जुनगडे, मराठे, शशिकांत पाटील, अदापुरे यांनी धाव घेतली. दरम्यान, जखमींना उपचारार्थ पाठवण्यात आले असून, घटनास्थळावर जखमी अवस्थेत असलेल्या गायीला उपचारासाठी बोरगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी नेले.
बातम्या आणखी आहेत...