आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Boys Killed Murdered By The Mother On Charges

दोन मुलांची हत्‍या केल्‍याचा आईवर केल्‍याचा आरोप ,

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-दोन चिमुकल्यांची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या महिलेच्या विरोधात सिव्हिल लाइन्स पोलिसांनी 16 जानेवारीला हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. स्वाती अशोक जैन (32) या महिलेने आपल्या तनिश (3) आणि तन्वी (6) या दोन मुलांची उशीने तोंड दाबून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. त्यानंतर तिने ब्लेडने स्वत:च्या हाताची नस कापून पंख्याला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी दरवाजा तोडून तिला उपचारासाठी स्थानिक आयकॉन रुग्णालयात दाखल केले. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे. मूळचे मेडशी (वाशिम) येथील अशोक जैन हे मुलांच्या शिक्षणासाठी चार वर्षांपासून अकोल्यात वास्तव्यास होते. शास्त्रीनगरातील आभा रेसिडेन्सीमध्ये तिसर्‍या माळ्यावर टी-दोन या फ्लॅटमध्ये राहत होते. अशोक जैन अकोल्यात खासगी नोकरीत कार्यरत आहेत. तनीश व तन्वी एका खासगी शाळेत शिकायचे. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी बुधवारी रात्रीच अशोक जैन यांचा जबाब नोंदवला. स्वाती जैन यांच्यावर आयकॉन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वाती जैन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली. याप्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलिसांनी स्वाती जैन यांच्याविरोधात भादंवि कलम 302 (हत्या करणे) व 309 (आत्महत्येचा प्रयत्न करणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

महिला बेशुद्ध :

दोन चिमुकल्यांची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या स्वाती जैन यांच्यावर आयकॉन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी स्वाती जैन यांचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या बेशुद्ध असल्याने जबाब नोंदवता आला नाही.