आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वणा नदीत डोंगा उलटून दोन मजुरांना जलसमाधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - शेतातील काम आटोपून परतताना डोंगा उलटल्याने नदीत बुडून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हिंगणघाट येथे वणा नदीच्या पात्रात विसर्जन घाटाजवळ घडली. डोंग्यात 30 ते 35 शेतमजूर प्रवास करत होते.

हिंगणघाट येथील शेतमजूर कान्हापूर (बोरगाव) शिवारात शेतातील कामासाठी गेले होते. शेतातील काम आटोपून सायंकाळी दोन जोडलेल्या डोंग्यांनी ते घरी परतत होते. वणा नदीच्या पात्रात विसर्जन घाटाजवळ खडकाला धडकलेल्या डोंग्याचे दोन तुकडे होऊन सगळे मजूर नदीच्या पात्रात पडले. तेथील युवक आणि नागरिकांनी मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यातील काहींना बाहेर काढण्यात आले. परंतु, दोघांचा म़ृत्यू झाला. आठ जणांना हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच गंभीर जखमींना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलिस, होमगार्ड, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी डेरेदाखल असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.