आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीतून येणारा दोन लाखांचा गुटखा पकडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - येथील दक्षिण रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरसीएफ) पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शनिवार, १८ एप्रिलला सकाळी १० वाजताच्या सुमारास महू ते अकोला या पॅसेंजर गाडीतून गुटखा पुड्यांचा साठा पकडला. मध्य प्रदेशातील बाजारामध्ये त्याची किंमत ६० हजार रुपये, तर महाराष्ट्रात दोन लाख रुपयांच्या जवळपास आहे. मात्र, हा गुटखा कोण घेऊन जात होते, हे कळू शकले नाही. आरसीएफ त्या दिशेने तपास करत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातून शहरात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असल्याचे सिद्ध झाले आहे.
जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. दरम्यान, सण, उत्सवाच्या काळात दरवर्षीच पोलिस आणि अन्न प्रशासन विभागाकडून कारवाई केली जाते. पण, त्यात सातत्य ठेवले जात नाही. असे असताना सहआयुक्त शरद कोलते यांनी मागील सहा महिन्यांत जिल्ह्यात मोठ्या कारवाया केल्या. पण, अद्याप कोणत्याही गुटखा किंगला कठोर शिक्षा झाली नसल्याने ते निर्ढावले आहेत. परिणामी, छुप्या मार्गाने गुटख्याची अावक सुरूच आहे. त्यातून महू ते अकोला या पॅसेंजर गाडीतून गुटखा येत असल्याची गुप्त माहिती शुक्रवारी रात्री दक्षिण रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली. त्याआधारे आरपीएफचे पोलिस निरीक्षक बी. के. मीणा यांच्या मार्गदर्शनात पाेलिस उपनिरीक्षक संतोष कांबळे आणि हेडकॉन्स्टेबल अशोक शेळके यांनी सापळा रचून हिवरखेड ते अकोट मार्गादरम्यान रेल्वेतून आठ पोते गुटखा पुड्या जप्त केल्या. मात्र, हा गुटखा कोण घेऊन येत होते, याचा शोध लागू शकला नाही.

गुटखा मिळतो ८० रुपयांना
एकानामांकित असलेल्या गुटख्याची पुडी काळ्या बाजारात सुमारे ८० रुपयाला विक्री होत आहे. यासोबतच छापील किंमत एक रुपया असलेल्या इतर कंपनीच्या गुटखा पुडीसुद्धा ते १० रुपयाला विकली जाते. मात्र, अन्न औषध प्रशासन कार्यालयाला अगोदरच रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. शपरिणामी, कारवाईसाठी मनुष्यबळ तोकडे पडत आहे.

बेलुऱ्यात गोडाउन
जिल्ह्यामध्येमध्य प्रदेशातून रेल्वे मार्गाने गुटखा येतोच. त्याशिवाय अमरावती जिल्ह्यातील बेलुरा परिसरात गुटखा माफियांचे गोडाउन आहे. गुटखा पुरवल्या जातो. त्यामुळे अन्न औषध प्रशासनासह पोलिस विभागानेसुद्धा या गोडाउनवरच कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासा
बहुतांशरेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्यामुळे गाडीमध्ये गुटखा ठेवण्याचे चित्रीकरण एका तरी कॅमेऱ्यामध्ये होऊ शकते. त्यासाठी पोलिसांनी महू ते अकोला या रेल्वे मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासावे. त्यातून आरोपीचा माग काढणे सोपे होईल.
पकडण्यात अालेला गुटखा.

माहिती द्या; कारवाई करू
दक्षिणरेल्वेत कुठे कुठल्याही पदर्थांची नियमबाह्य वाहतूक होत असेल तर माहिती द्या. आरोपी स्वत: दुसऱ्या डब्यात बसतात. त्यामुळे माल पकडला जातो. पण, आरोपी ओळखू येत नाहीत.'' बी.के. मीणा, निरीक्षक,दक्षिण रेल्वे सुरक्षा बल, अकोला