आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Police Station In The District Will Be Implemented Soon Nikesh Khatamode

जिल्ह्यामध्ये लवकरच दोन पोलिस ठाणे होणार कार्यान्वित- निकेश खाटमोडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हय़ात दोन पोलिस ठाण्यांना मंजुरी प्रदान केली आहे. त्यानुसार दोन पोलिस ठाणे पंधरा दिवस ते एक महिना कालावधीत कार्यान्वित होणार आहे’, अशी माहिती जिल्हा पोलिस उपअधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी दिली.
नीकेश खाटमोडे म्हणाले की, पोलिसांची संख्या किती असावी, यासाठी लोकसंख्या हा निकष लागू होत नाही, तर गुन्हेगारी हा निकष पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असतो. त्यानुसार अकोट ग्रामीण आणि डाबकी रोड येथे पोलिस ठाण्याचा प्रस्ताव होता. तो मंजूरही झाला आहे. त्यामुळे डाबकी रोड येथे नव्याने पोलिस ठाणे कार्यान्वित होणार आहे. सध्या जिल्हय़ात 2285, तर अकोला शहरात सुमारे 800 पोलिस कार्यरत आहेत. शहरांमध्ये पोलिसांचे गुन्हेगारीवर नियंत्रण आहे.
पोलिसांना सल्ला देताना ते म्हणाले की, सवंग प्रसिद्धी करण्याची पोलिस खात्यातील अनेकांना सवय लागली आहे. मात्र, प्रसिद्धी म्हणजे पोलिसांचे कार्यपुस्तक नव्हे. त्यांनी दरोडा, घरफोड्या, खून आदी गुन्हे करणार्‍यांवर जरब बसवण्यासाठी लक्ष केंद्रित केले पाहिजे. छोट्या कारवायांवर पोलिसांची शक्ती वाया जात आहे. हायवेवर पोलिसांची गस्त वाढवल्यानेसुद्धा गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता आले. पोलिसांची संख्या वाढवली, तरी गुन्हेगारी कमी होणार नाही. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढणारच, असेही ते म्हणाले.