आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन शाळकरी मुले गेले घरून निघून, आठवड्यातील दुसरी घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दहाव्या वर्गात शिकणारे दोन शाळकरी मुले १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर घरून निघून गेले. यातील एक मुलगा डाबकी रोड येथील तर दुसरा मुलगा शास्त्रीनगर येथील रहिवासी आहे. त्यांच्या पालकांनी डाबकी रोड पोलिस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दिली आहे.
डाबकी रोड येथील शिवम संदीप अग्रवाल हर्ष जयेश मकडिया हे दोघे मित्र आहेत. दोघेही १० नोव्हेंबर रोजी रात्री घरून निघून गेले. यासंदर्भात पोलिसांनी आणि त्यांच्या पालकांनी केलेल्या चौकशीमध्ये हे दोघे भागडिया हॉस्पिटलजवळून रेल्वे स्टेशनच्या दिशेने रात्री २.३० वाजताच्या सुमारास निघून जाताना तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आले. त्यानंतर रेल्वेस्थानकावर चौकशी केल्यानंतर त्यांनी तिकीट काढल्याचेही समजले. मात्र, त्यांनी कुठले तिकीट घेतले हे समजू शकले नाही. घरून कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाचा दबाव किंवा कोणतेही भांडण झाले नसल्याची माहिती पवन केडिया यांनी दिली. यासंदर्भात कुणालाही माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पाच दिवसांपूर्वी नोएल शाळेचे तीन मुलेसुद्धा घरून गेले होते.