आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन विद्यार्थ्यांचा वारीच्या डोहात बुडून मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवरखेड - तेल्हारातालुक्यातील वारी येथे दर्शनासाठी आलेल्या जळगाव येथील शरद पवार पॉलिटेक्निक कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवार, फेब्रुवारी रोजी दुपारी च्या सुमारास घडली. चैतन्य दत्तात्रय डिवरे (वय १९, रा. अकोला) नंदकिशोर पुंडलिक वानखडे (रा. शेलगाव मुकुंद ता. नांदुरा) अशी मृतांची नावे आहेत.
जळगाव येथील शरद पवार पॉलिटेक्निक कॉलेजचे सात विद्यार्थी राम प्रमाेद खर्चे, राधेश्याम उद्धव पाटील, वैभव भास्कर चौधरी, आकाश लक्ष्मण सुरदशे, योगेश सुपळा गव्हाळे यांच्यासह मृतक चैतन्य डिवरे नंदकिशोर वानखडे हे सर्व वारी येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यानंतर दुपारी आसरामाता मंदिरासमोरील डोहामध्ये अंघोळीसाठी गेले असताना चैतन्य डिवरे नंदकिशोर वानखडे हे दोघे पाण्यात बुडाले. मृतक चैतन्य नंदकिशोर यांना पोहता येत नसल्याची माहिती राधेश्याम पाटील यांनी हिवरखेड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेहांना बाहेर काढले. उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आले. याप्रकरणी हिवरखेड पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.