आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेताल वाहतूक; पोलिसांचा चाप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बेताल वाहतुकीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी सोमवारी शहरात मोहीम राबवली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुचाकीधारकांवर कारवाई करत पोलिसांनी सुमारे 198 दुचाकी पोलिस ठाण्यात जमा केल्या. पोलिसांनी दुचाकींची कागदपत्रे तपासून दंडही ठोठावला. त्यानंतरच पोलिसांनी दुचाकी सोडल्या. विनाक्रमांक असलेल्या दुचाकीवरून फिरणार्‍या युवकांची शहरात मोठी संख्या आहे. अशातच बेभानपणे दुचाकी चालवणार्‍यांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जुने शहर, कोतवाली, खदान, सिव्हिल लाइन्स, रामदासपेठसह शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीचे उल्लंघन करणार्‍या दुचाकीधारकांवर कारवाई केली. पोलिसांनी दुचाकीस्वारांकडून दंडही वसूल केला. या करवाईत पोलिस मुख्यालयातील राखीव पोलिसांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कारवाईची मोहीम सुरूच होती.
आणखी होणार कारवाई : ट्रिपलसिट जाणार्‍या दुचाकीस्वारांची संख्या मोठी आहे. दुचाकीवरून कट मारणे, हायबिम लाइट लावणे, कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न वाजवणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या दुचाकीस्वारांविरुद्ध कोतवाली पोलिस लवकरच मोहीम राबवणार आहेत.