आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायपिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रक्रियेबाबत संभ्रम कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- टंकलेखनयंत्राऐवजी आता संगणकाचा वापर होणार असल्याची घोषणा शासनाने काही महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतरीत्या काहीही हाती आल्याने या प्रक्रियेबाबत टायपिंग संचालक तथा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरणांतर्गत टायपिंग हद्दपार होणार असून, टंकलेखन यंत्राऐवजी आता संगणकाचा वापर केल्या जाणार आहे. ई-पेपरलेस सिस्टिम राबवण्यावर भर दिल्या जात असल्याने लवकरच राज्यातील सर्व शासनमान्य टंकलेखन-लघुलेखन संस्थांमध्ये संगणक टायपिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. 15 नोव्हेंबरदरम्यान याबाबतची घोषणा राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत करण्यात आली. त्यामुळे टायपिंंग संचालकामध्ये संभ्रम निर्माण झाला, तर टायपिंग परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनाही सुचेनासे झाले आहे. परीक्षा परिषदेच्या समितीने मंजूर केलेल्या कॉम्प्युटर टायपिंग कोर्स 1991 च्या मान्यता संचालन नियमावलीनुसार फक्त शासन मान्यता प्राप्त राज्य परीक्षा परिषद पुणेसोबत संलग्नता असलेल्या टंकलेखन लघुलेखन संस्थांमध्ये हा संगणकीय टायपिंग कोर्स सुरू होणार आहे. शिक्षण परिषदेच्या 31 आक्‍टोंबर 2013 रोजीच्या बैठकीनुसार संगणकीय टायपिंग अभ्यासक्रम आगामी काळात राबवल्या जाईल, असे परिषदेने सांगितले होते. मात्र, यावर केव्हा अंमलबजावणी होईल याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह संचालकामध्ये संभ्रम कायम आहे. संगणकीय टायपिंग अभ्यासक्रम केव्हा सुरू होणार असून, टंकलेखन टायपिंग परीक्षा पद्धती केव्हा बंद होईल, याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.