आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Udhav Thackeray Rally Late Due To High Temperature In Akola

उद्धव यांच्या सभेला तप्त उन्हाचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ऑक्टोबरमधील तप्त उन्हामुळे व्याकूळ झालेल्या लोकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये अग्निपरीक्षाच द्यावी लागली. पाण्यासाठी जीवाची लाहीलाही, तर उन्हापासून आसरा शोधण्यात अनेक जण व्यस्त होते. शिवसेना नेत्यांनी आवाहन केल्यावरही उन्हामुळे उपस्थितांची हिंमत झाली नाही. सभेदरम्यान तसेच सभा संपताना आलेल्या पावसाच्या सरींनी लोकांना दिलासा मिळाला.

शिवसेनेच्या अकोला जिल्ह्यातील पाचही उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी दुपारी रादेगो महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. सेनेचे विभागीय संघटनमंत्री आमदार दिवाकर रावते, अकोला पश्चिमचे सेनेचे उमेदवार गुलाबराव गावंडे, अकोला पूर्वचे गोपीकिशन बाजोरिया, अकोटचे संजय गावंडे, मूर्तिजापूरचे महादेव गवळे, बाळापूरचे कालीन लांडे, जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, महानगरप्रमुख तरुण बगेरे, महिला आघाडीच्या ज्योत्स्ना चोरे, सेनेचे नेते मिलिंद नार्वेकर, राजेश मिश्रा, युवा सेनेचे संग्राम गावंडे, अॅड. अनिल काळे, धनंजय गावंडे, प्रदीप गुरुखुद्दे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.आमदार गोपीकिशन बाजोरिया, गुलाबराव गावंडे, संजय गावंडे, माजी आमदार दाळू गुरुजी, रामाभाऊ कराळे यांनी सभेला संबोशित केले.
उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे, कै. माँ साहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तप्त ऊन-पावसाची हजेरी अशा वातावरणात सभा झाली. दुपारी वाजताच्या सुमारास सभा आटोपून ठाकरे चिखलीसाठी रवाना झाले.
विदर्भ भगवा करण्यासाठी दोन दिवस फिरणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
गुंडांचा या निवडणुकीत सफाया करा, असे आवाहन गुलाबराव गावंडे यांनी केले.
शिवसेनेत प्रवेश
माजीमंत्री डॉ. दशरथ भांडे, माजी महापौर सुरेश पाटील, उद्योजक विवेक पासरकर, श्रीकृष्ण ढोरे, नंदू ढोरे, सुरेश देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

विदर्भाशी माझे नाते
विदर्भाशीआपले भावनिक नाते असल्याने या भागाच्या समस्या सोडवण्यासाठी जीवाचे रान करीन, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. माझी आजी अचलपूरची असल्याने या मातीशी माझे अजोड नाते आहे.

सभेला झाला उशीर
सभेसाठी११.३० वा. ची वेळ देण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात दुपारी सव्वादोन वाजता सभेला सुरुवात झाली. वाजून ५६ मिनिटांनी उद्धव ठाकरे यांनी भाषण संपवले. तप्त उन्हामध्ये इतका वेळ वाट पाहून लोक त्रस्त झाले होते.