आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - .जिल्ह्यामध्ये गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. रात्री वाजताच्या सुमारास जिल्ह्यासह शहरामध्ये अवकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. या पावसामुळे शहरातील विद्युत पुरवठा काही वेळ खंडित झाला होता तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, कांदा, टरबूज पिकांचे मोठे नुकसान झाले, तर आंब्याचा बहरही घसरला आहे. दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

पश्चिम विदर्भातील अकोल्यासह काही जिल्ह्यांत गुरुवारी रात्री च्या सुमारास पावसाने हजेरी लावली, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. आणखी दोन दिवस असे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राजस्थान आणि लगतच्या परिसरात "अप्पर सायक्लोनिक डेव्हलपमेंट'मुळे मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या काही भागांत पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला असून, थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.