आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unauthorized Construction,Latest News In Divya Marathi

बाछुकांनी स्वत:च पाडले त्यांचे अनधिकृत बांधकाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेने अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्याची मोठय़ा धडाक्यात सुरू केलेली कारवाई मध्येच काहीसी थंडावल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्याला आणखी बळ मिळाले ते भाजपचे ज्येष्ठ नेते बसंत बाछुका यांनी स्वत:च पुढाकार घेऊन बांधकाम पाडण्यासाठी उचललेल्या कृतीचे. ही कृती मनपाची कारवाई थंडावल्याची जाणीव करून देणारी असून, यामध्ये मात्र, इतर बिल्डरांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या निमित्ताने मनपा केवळ बांधकामाचे मोजमाप व नोटीस देण्यापुरतीच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाऊ हम तो आपके साथ थे : भाजपचे नेते असलेल्या बसंत बाछुका यांनी स्वत: पुढाकार घेत बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतला. पण, इतरांनी त्यांना तसे न करण्याचा सल्ला दिला. बाछुका यांनी आपण बिल्डर नसल्याचे सांगत हा सल्ला धुडकावला, त्यामुळे इतरांची मात्र गोची झाली. बाछुका यांनी घेतलेला पुढाकार इतरांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. आता इतर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

क्रेडाईमध्ये वाद

बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईत वाद निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे. व्यावसायिक अनधिकृत बांधकाम प्रकरणात संघटनेची ठोस भूमिका नसल्याची माहिती आहे. त्यामुळे काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधीच्या घरी हा वाद उफाळून आला थेट एकमेकांची उणीदुणी काढण्यात आल्याने तो सार्वजनिक झाला.