आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला शहरातील भूमिगत गटार योजनेच्या तांत्रिक छाननीचे काम सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - शहराच्या महत्त्वाकांक्षी भूमिगत गटार योजनेच्या टेक्निकल स्क्रूटिनीचे काम मजीप्राकडून सुरू आहे. त्यामुळे सुधारित प्रकल्प अहवालाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. तांत्रिक मंजुरी मिळाल्यास भूमिगत गटार योजनेच्या कामाचा पुढील मार्ग मोकळा होणार आहे.
महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी आल्यापासून भूमिगत गटार योजनेवर चर्चा सुरू आहे. २००६ ला या योजनेला महापालिकेने मंजुरी दिल्यानंतर २०११ ला केंद्र शासनाने ५० कोटी रुपयांचा हप्ताही दिला. प्रकल्पाचे कामही रामकी कंपनीला देण्यात आले होते. परंतु, निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याबाबतच्या तक्रारी राज्य शासन तसेच न्यायालयात दाखल झाल्या होत्या.
यानंतर राज्य शासनाने निविदा प्रक्रिया रद्द करून ही योजना १०० एमएलडीवरून ६० एमएलडीची तयार करण्याची सूचना केली होती. त्यानंतर या योजनेचा सुधारित प्रकल्प अहवाल तयार करून २०१३ ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता. परंतु, जीवन प्राधिकरणाने शुल्काची मागणी केल्यामुळे तांत्रिक मंजुरीचे काम रखडले होते.
आयुक्त शेट्ये यांनी या शुल्काचा भरणा मजीप्राकडे केला. त्यानंतर मजीप्राने काम सुरू केले. प्राप्त माहितीनुसार टेक्निकल स्क्रूटिनीचे काम सुरू असून, काही दिवसांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर या गटार योजनेच्या अंमलबजावणीच्या हेतूने पुढील काम सुरू होऊ शकते.

अहवाल लवकरच प्राप्त होईल

भूमिगत गटार योजनेच्या प्रकल्प अहवालाच्या टेक्निकल स्क्रूटिनीचे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. यानंतर या योजनेचा कामाचा मार्ग मोकळा होईल.'' आयुक्तसोमनाथ शेट्ये