अकोला - विवाह म्हणजे नवदाम्पत्याला पूर्णत्वाची प्रचिती देणारा महत्त्वपूर्ण संस्कार. हा संस्कार म्हणजे मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण. त्यामुळे मुलीचे नातेवाईक मोठ्या आनंदानं लग्नात पडेल ते काम करतात. त्यातही समाजसेवक शंकरबाबा पापळकरांची सोळावी मानसकन्या ‘कांती’ जेव्हा लग्नाच्या मांडवात उभी राहते, तेव्हा अख्ख्ये अकोलेकर एकजुटीने इवल्याशा वाटणार्या सोहळ्याला मोठ्या उत्सवाचं रूप देतात. सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा हा विवाह सोहळा रविवारी अकोल्यात मोठ्या थाटात पार पडला.
अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य अपंग बालगृह या अखिल भारतीय सेवाभावी संस्थेची प्रवेशिता कांती आणि बाळापूर येथील धनंजय डोळसकर यांचा शुभविवाह संध्याकाळी मराठा मंडळ मंगल कार्यालयात झाला. प्रकाश पोहरे आणि साधना पोहरे यांनी कांतीचे कन्यादान केले. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील हे मुलीचे काका म्हणून उपस्थित होते. या उत्सवात केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार रणधीर सावरकर, महापौर उज्ज्वला देशमुख, सुहासिनी धोत्रे, माजी मंत्री अजहर हुसेन, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, विभागीय उपायुक्त प्रा. संजय खडसे, जगन्नाथ ढोणे, महादेवराव भुईभार, विजय अग्रवाल, मधुकर कांबळे, डॉ. आर. बी. हेडा, श्रीकांत पिसे, उद्धवराव गाडेकर, पंडित महाराज, डॉ. सुधीर ढोणे, डॉ. सुभाष भडांगे, डॉ. विजय नानोटी, अनिल गाडेकर, केशव इंदाने, तहसीलदार संतोष शिंदे आदी सहभागी हाेते.
नातलगांची मांदियाळी
कांतीचे आई-वडील म्हणून प्रकाश पोहरे, साधना पोहरे, काका पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, तर भाऊ डॉ. किशोर ढोणे, प्रा. सुरेश तायडे, गजानन वजिरे, अविनाश देशमुख, विधुर शंकरबाबा पापळकर, प्रवीण जैन, सुरेश पाटील, पुरुषोत्तम शिंदे, संजय खटोड, अशोक मंडले, विजय ढोणे, शैलेश इंगळे, उमेश पाटील, राजेश गावंडे, चंदू शिरसाट, प्रा. संदीप बाजरे, प्रमोद म्हैसने, घनश्याम शिवाल, रामरतन हिरळकर, ज्ञानेश्वर खेडकर, अमोल येळणे यांनी सर्व व्यवस्था पाहिली.
नातेवाइकांचे शुभाशीर्वाद
अनाथ मुलांसाठी प्रत्येक जण काही काळापुरते
आपुलकी दाखवते. पण, शंकरबाबासारखे फार कमी आहेत. सर्वांनी या मुलांचे पालकत्व घेण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले, तर मुलीचे काका, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी हा असा अविस्मरणीय लग्न सोहळा अकोल्यात झाला हे आपल्यासाठी भाग्याची, अभिमानाची बाब असल्याचे म्हटले. श्री गजानन महाराज संस्थानचे शिवशंकरभाऊ पाटील यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली.