आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाचा पोशिंदा जगाचा विनाशक झाला तर..’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- आपला अन्नदाता शेतकरी उत्पन्न आणि कर्जाचा मेळ साधता साधता कायम आर्थिक विवंचनेत अडकला. सावकाराचे कर्ज, वादळ, गारपीट असे संकट झेलणार्‍या शेतकर्‍यांची नेहमीच उपेक्षा झाली. त्यातूनच आत्महत्यांना सुरुवात झाली. विदर्भातील शेतकर्‍यांच्या याच प्रश्नांचा वेध घेणारा ‘भाकर’ हा मराठी चित्रपट येत्या 23 मे रोजी राज्यात सर्वत्र प्रदश्रित होत आहे, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दश्रक सहदेव पोहनकर यांनी दिली. येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पोहनकर म्हणाले, तिरुपती बालाजी मोशन पिक्चर्स प्रस्तुत वर्‍हाड चित्र निर्मित हा चित्रपट ‘जगाचा पोशिंदा जगाचा विनाशक झाला तर.’ या टॅग लाइनवर बेतलेला आहे. महेंद्र पवनकुमार सिंह अँड टीम प्रस्तुत या चित्रपटाचे सहनिर्माते चंद्रशेखर पितळे, चंद्रकांत मेहरे हे आहेत. हा चित्रपट विदर्भातील शेतकर्‍यांच्या जीवनाची कहाणी आहे. त्यांची होणारी फरपट, भौगोलिक परिस्थिती, अभ्यास न करता येणारे शासनाचे पॅकेज, नैसर्गिक असमतोलपणा, आर्थिक फसवणूक, राजकारण यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळतो तर दुसरीकडे तरुण पिढी वाईट मार्गाकडे वळते. अशाच एका गावातील या कथानकातील तरुण नक्षलवादाकडे वळतात. चित्रपटात किशोर कदम, नितीन भजन, आशुतोष भाकरे, जयेश शेवलकर, संजय कुळकर्णी, पूर्णिमा वाव्हळ यांच्या भूमिका आहेत. लेखन, दिग्दश्रन विजय पोहनकर, छायाचित्रण राजा फडतरे यांचे आहे. संकलन दिनेश मेंगडे, गीत कविता पिंपळे, संगीत रोहित नागभिडे यांचे आहे, तर गायक ज्ञानेश्वर मेश्राम, नंदेश उमप, मधुरा कुंभार आहेत. मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही म्हणून राज्यातील 37 थिएटर थेट भाड्याने घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चित्रपटातील 75 टक्के कलावंत वर्‍हाडच्या मातीतील असल्याचे ते म्हणाले. बुलडाणा जिल्हय़ातील सोनाळा या गावीच चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण झाले असून, हा चित्रपट येथील शेतकर्‍यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने बघावा, असे आवाहन त्यांनी केले.