आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतीचे तुकडे पडू देणार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘सीलिंग कायद्याला आमचा विरोध आहे. याचा निषेध आम्ही करतो. येत्या 10 ऑगस्ट रोजी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे अमरावती येथे पुढील रणनीती घोषित करतील. शेतीचे तुकडे कोणत्याही परिस्थितीत पडू देणार नाही, ही शिवसेनेची भूमिका राहणार आहे,’ असे मत शिवसेनेचे माजी आमदार गुलाबराव गावंडे यांनी येथे व्यक्त केले. येथे गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केले.

सीलिंग कायद्याचा फटका राज्यात विदर्भ व मराठवाडा या भागातील कोरडवाहू शेती करणार्‍या शेतकर्‍यांना बसणार आहे. शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाने विदर्भातील शेतकरी आधीच त्रस्त असताना या नव्या कायद्याने विदर्भातील शेतकरी अडचणीत सापडतील. निवडणुका झाल्यानंतर तो लागू होईल, असे भाकीत त्यांनी वर्तवले. केंद्र व राज्य शासनाचे लक्ष हे फक्त शेतकर्‍यांवर आहे. मोठ मोठय़ा कंपन्या व सेझ यांच्याकडे असलेल्या जमिनींकडे शासनाचे लक्ष नाही. शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचे षड्यंत्र शासनाचे आहे, असे ते म्हणाले. 1961 मध्ये 104 एकरसाठी, तर 1974 मध्ये 54 एकरासाठी सीलिंग लावले होते. या दोन्ही काळात शेतकर्‍यांकडून शासनाने जमिनी संपादित केल्या.

सीलिंग कायद्याचे परिणाम
25 ते 30 एकर शेती असलेला सधन शेतकरी समजला जातो, तर सीलिंगमुळे येणारी पिढी दारिद्रय़रेषेखाली जाईल. आत्महत्येचे प्रमाण वाढेल, भूदानासाठी दिलेली शेतकर्‍यांची जमीन कोठे आहे. भूदान यज्ञाच्या नावाखाली सरकारकडे जमा असलेली जमीन कोणाकडे आहे. भूदानमध्ये ज्यांच्याकडून जमिनी घेतल्या त्या परत द्याव्या.